शाहरुख खानचे ‘मन्नत’ नव्या रुपात! नुतनीकरणासाठी कुटुंब काही काळ भाड्याच्या घरात!

‘किंग ऑफ रोमान्स’ आणि ‘बादशहा’ अशी ओळख असलेल्या शाहरुख खानच्या घराची, म्हणजेच ‘मन्नत’ची, पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. वांद्रे येथील बॅण्डस्टँडवर असलेला हा आलिशान बंगला शाहरुखच्या चाहत्यांसाठी एक तीर्थस्थळच बनला आहे. त्याच्या वाढदिवशी लाखो चाहते येथे जमून त्याला शुभेच्छा देतात.
मात्र, आता शाहरुख खान काही काळासाठी ‘मन्नत’ सोडणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, लवकरच ‘मन्नत’मध्ये नुतनीकरणाचे मोठे काम सुरू होणार आहे. या कामासाठी शाहरुखला कोर्टाकडून अधिकृत परवानगी मिळाली असून, हे काम यावर्षी मे महिन्याच्या आधी सुरू होणार आहे. या नुतनीकरणाच्या अंतर्गत बंगल्याचा काही भाग विस्तारीत केला जाणार आहे. या नव्या विस्तारामुळे ‘मन्नत’ अधिक भव्यदिव्य आणि आलिशान दिसणार आहे.
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात गौरी खानने महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी (MCZMA) कडून ‘मन्नत’ला दोन अतिरिक्त मजले जोडण्याची परवानगी मागितली होती. या विस्तारामुळे बंगल्याचे बांधकाम क्षेत्र ६१६.०२ चौरस मीटरने वाढणार आहे. ‘मन्नत’ हा ग्रेड ३ ऐतिहासिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट असल्याने कोणताही संरचनात्मक बदल करण्यासाठी अधिकृत परवानगी आवश्यक असते. आता ही परवानगी मिळाल्याने मोठ्या प्रमाणावर नुतनीकरणाचे काम सुरू होणार आहे.
या नुतनीकरणाच्या कामासाठी जवळपास २५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. बंगल्याच्या काही जुन्या भागांचे देखील पुनर्बांधणीचे काम करण्यात येणार आहे. यामुळे काही भाग अधिक मजबूत आणि आधुनिक केला जाणार आहे.
कामाच्या कालावधीत बंगल्यात फक्त कामगार उपस्थित असतील, त्यामुळे शाहरुख खान आणि त्याचे कुटुंब काही काळासाठी भाड्याच्या घरात राहणार आहे. शाहरुख आणि गौरी खान यांनी आधीच काही पर्यायांवर विचार केला असून लवकरच नव्या घरात स्थलांतर होणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतरच ते पुन्हा आपल्या आवडत्या ‘मन्नत’मध्ये परत येतील.
शाहरुख खानचे चाहते मात्र या नुतनीकरणाच्या बातमीने उत्सुक झाले आहेत. भविष्यात अधिक भव्य आणि सुधारित ‘मन्नत’ पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. हे नुतनीकरण पूर्ण झाल्यानंतर हा बंगला अधिकच देखणा आणि आकर्षक होणार असल्याचे बोलले जात आहे.

Related Posts

चक्क 30 वर्षानंतर राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रेची भेट; सोशल मीडियावर व्हिडीओची भरपूर चर्चा !

सोशल मीडियावर मनसे प्रमुख राज ठाकरे आणि अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांच्या 30 वर्षानंतरच्या भेटीच्या व्हिडीओला सध्या पसंती मिळत असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानात अभिजात…

Leave a Reply

You Missed

नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुनर्जन्म? भाजपा खासदाराच्या विधानावर वादंग..!

नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुनर्जन्म? भाजपा खासदाराच्या विधानावर वादंग..!

सुनीता विल्यम्स पृथ्वीच्या दिशेने; अखेर नऊ महिन्यानंतर परतीचा प्रवास सुरू…!

सुनीता विल्यम्स पृथ्वीच्या दिशेने; अखेर नऊ महिन्यानंतर परतीचा प्रवास सुरू…!

नागपुरमध्ये दगडफेक, जाळपोळ आणि अफवा ; नितीन गडकरींचे नागरिकांना शांततेचे आवाहन !

नागपुरमध्ये दगडफेक, जाळपोळ आणि अफवा ; नितीन गडकरींचे नागरिकांना शांततेचे आवाहन !

दंगलीचे सावट! महालमधील हिंसाचाराने नागपूर सतर्क…

दंगलीचे सावट! महालमधील हिंसाचाराने नागपूर सतर्क…

नागपूर महालमध्ये दोन गटांमध्ये तणाव; दगडफेक, वाहनांची तोडफोड

नागपूर महालमध्ये दोन गटांमध्ये तणाव; दगडफेक, वाहनांची तोडफोड

इतिहास जिवंत करणारे भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन..!

इतिहास जिवंत करणारे भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन..!

“मी मराठी – अभिमान महाराष्ट्राचा”-आंबोली येथे आयोजित भव्य दिव्य शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न..!

“मी मराठी – अभिमान महाराष्ट्राचा”-आंबोली येथे आयोजित भव्य दिव्य शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न..!

राज ठाकरेंच्या शिवजयंतीनिमित्त संदेशात प्रेरणादायी विचार…!

राज ठाकरेंच्या शिवजयंतीनिमित्त संदेशात प्रेरणादायी विचार…!

फरहान आझमी यांची काँग्रेसच्या शिस्तभंग समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

फरहान आझमी यांची काँग्रेसच्या शिस्तभंग समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती