महार रेजिमेंट ही भारतीय सैन्यातील सर्वांत शौर्यशाली आणि प्रतिष्ठित इन्फंट्रीपैकी एक आहे. या रेजिमेंटचा इतिहास देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. 1818 साली झालेल्या भीमा कोरेगावच्या युद्धात महार सैनिकांनी पराक्रमाची अतीव शौर्यगाथा लिहिली. या लढाईतील विजयाच्या स्मरणार्थ ब्रिटिशांनी भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभ उभारला आणि महार सैनिकांच्या शौर्याला मानवंदना दिली. 1941 साली महार रेजिमेंटची अधिकृत स्थापना करण्यात आली, आणि त्यानंतर आजपर्यंत त्यांनी भारतीय सैन्याला अमूल्य योगदान दिले आहे.
रेजिमेंटचा थेट युद्धांतील सहभाग
महार रेजिमेंटने विविध महायुद्धांत आणि रणांगणांवर थेट लढून विजय संपादन केला आहे.
- भारत-पाकिस्तान युद्ध (1947-48):
काश्मीरमधील उरी, टिटवाल, चकोथी आणि द्रास येथील रणांगणांवर महार सैनिकांनी शत्रूंना जोरदार प्रत्युत्तर दिले. - गोवा मुक्तीसंग्राम (1961):
गोव्याला पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी महार रेजिमेंटने महत्त्वाची भूमिका बजावली. - भारत-चीन युद्ध (1962):
चुशूल, दौलतबेग ओल्डी, आणि लडाख येथे महार सैनिकांनी चीनी सैन्याला परतवून देशाच्या सीमा सुरक्षित ठेवल्या. - भारत-पाकिस्तान युद्ध (1965 व 1971):
कच्छ, काश्मीर, पंजाब आणि बांग्लादेशमधील रणांगणांवर महार रेजिमेंटने पराक्रम गाजवला. शमशेरनगर, मौलवी बाजार आणि सिल्हेट येथील विजयांनी या रेजिमेंटचा लौकिक वाढवला. - कटांगा शांती मोहिम (1961):
कांगोतील कटांगा प्रांतात शांतता प्रस्थापित करण्यात महार रेजिमेंटचे विशेष योगदान राहिले आहे.
सीमावर्ती भागांतील विशेष योगदान
महार रेजिमेंटचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सीमावर्ती भागांतील शांतता प्रस्थापनेसाठी त्यांनी दिलेले योगदान. फाळणीनंतरच्या काळात सीमावर्ती भागातील लोकांना सैन्याशी जोडणे आणि शांतता राखणे या कार्यात महार सैनिक नेहमीच आघाडीवर होते. सीमावर्ती भागांतील लोकांशी त्यांचा थेट संवाद आणि आपुलकी यामुळेच हे शक्य झाले.
प्राप्त सन्मान
महार रेजिमेंटला देशासाठी दिलेल्या पराक्रमासाठी अनेक महत्त्वाचे सन्मान मिळाले आहेत:
- 1 परमवीर चक्र
- 4 महावीर चक्र
- 29 वीर चक्र
- 12 शौर्य चक्र
- 63 सेना पदके
महत्त्वाचे लष्करी नेते
महार रेजिमेंटच्या यशामध्ये नेतृत्वाचा मोठा वाटा आहे. जनरल के. व्ही. कृष्णराव आणि जनरल कृष्णस्वामी सुंदरजी यांनी या रेजिमेंटमधून भारतीय सैन्याचे नेतृत्व केले आणि सैन्याला अधिक मजबूत केले.
1984 बंडखोरीत महार रेजिमेंटची भूमिका
इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर 1984 साली शिख सैनिकांनी मोठा विद्रोह केला होता. त्यावेळी पुणे, मुंबई, आणि अंबाला येथील लष्करी छावण्यांमध्ये महार सैनिकांनी या बंडखोरांना अटक करून देशाची सुरक्षा राखली.
इतिहासाला भिडणारे प्रश्न आणि उत्तर
आज काही समाजघटक महार रेजिमेंटवर प्रश्न उपस्थित करतात. परंतु इतिहास साक्ष देतो की, महार रेजिमेंटने आपल्या पराक्रमाने देशाच्या सीमा सुरक्षित केल्या आहेत. सीमावर्ती भागांचा 12,000 किलोमीटर लांब पट्टा संरक्षित ठेवण्यात महार रेजिमेंटचे मोठे योगदान आहे.
जागृत महाराष्ट्र न्यूज संपादक अमोल भालेराव, मुंबई
महार वीर योद्धाओं का वीर गाथा बहुत बढ़िया आप ने लिखे है आप का लेख बहुत विचारणीय और जन जागृत हेतु बहुत अच्छा लेख है।
जय भारत जय संविधान नमो बुद्धाय 💙🇮🇳🧡