लातूर:जळकोट-कुणकी
शिक्षक म्हणजे केवळ ज्ञान देणारे व्यक्तिमत्त्व नसून विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा शिल्पकार असतो. अशा शिक्षकाच्या भूमिकेला समर्पित असलेल्या आणि शैक्षणिक क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या मारुती रणुबाई नागोराव घोटरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा श्री समर्थ धोंडूतात्या विद्यालय, कुणकी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
मारुती घोटरे यांनी आपल्या शिक्षक जीवनात विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या घडणीसाठी अमूल्य योगदान दिलं. त्यांनी शिक्षकी पेशाला फक्त नोकरी म्हणून पाहिलं नाही, तर विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन करणं, त्यांची स्वप्नं उंचावणं आणि त्यांना मदत करणं हे आपलं ध्येय मानलं. विशेषतः गरीब व वंचित वर्गातील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी वेळोवेळी आर्थिक आणि शैक्षणिक मदत केली.
कार्यक्रमादरम्यान संस्था सचिव आणि संचालक ज्ञानोबा जाधव यांनी त्यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितलं की, “मारुती घोटरे यांनी विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञानच दिलं नाही, तर त्यांना स्वावलंबी बनवून जीवनातील यशस्वी मार्ग दाखवला. त्यांची सेवा ही शिक्षकांच्या कर्तव्याचं आदर्श उदाहरण आहे.”
या सोहळ्याला मन्मथअप्पा किडे (उपनराध्यक्ष), डॉ. शिवाजी जवळगेकर, नर्सिंग घोडके, विलास सिंदगिकर, चंदन पाटील, हरिदास तम्मेवार, किशनराव सोनटक्के यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांनीही आपले अनुभव शेअर करत घोटरे सरांना शुभेच्छा दिल्या.
मारुती घोटरे यांच्या या गौरवाने शिक्षकांच्या समाजातील भूमिकेचं महत्त्व अधोरेखित केलं आहे. त्यांचा आदर्श घेत, इतर शिक्षकांनीही समाजप्रगतीसाठी योगदान देण्याची प्रेरणा घेतली पाहिजे.
डोंबिवली: एमबीबीएस प्रवेशाचे आमिष दाखवून १६ लाखांची फसवणूक !
शासकीय कोट्यातून MBBS प्रवेश मिळवून देतो असे आमिष दाखवून बदलापूर आणि उल्हासनगरमधील तीन व्यक्तींनी डोंबिवली एमआयडीसी परिसरातील एका नागरिकाची तब्बल १६ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केली. ही रक्कम उकळूनही…