डोंबिवली: एमबीबीएस प्रवेशाचे आमिष दाखवून १६ लाखांची फसवणूक !

शासकीय कोट्यातून MBBS प्रवेश मिळवून देतो असे आमिष दाखवून बदलापूर आणि उल्हासनगरमधील तीन व्यक्तींनी डोंबिवली एमआयडीसी परिसरातील एका नागरिकाची तब्बल १६ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केली. ही रक्कम उकळूनही विद्यार्थिनीचा प्रवेश न करता तिचे संपूर्ण शैक्षणिक वर्ष वाया घालवले. ही फसवणूक २०२१ ते २०२२ या कालावधीत घडली असून, याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

असा रचला फसवणुकीचा कट…

तक्रारदाराने आपल्या मुलीच्या MBBS प्रवेशासाठी काही लोकांशी संपर्क केला असता आरोपींनी स्वतःला शिक्षण क्षेत्रातील उच्चपदस्थ असल्याचे भासवले. यापैकी एकाने स्वतःला केईएम रुग्णालयाच्या व्यवस्थापन समितीचा सदस्य, तर दुसऱ्याने नाशिकमधील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील अधिकारी असल्याचे सांगितले.

प्रवेश प्रक्रियेसाठी ५० लाख रुपये लागत असल्याचे सांगून नंतर १५ लाखांवर तडजोड करण्यात आली. हे पैसे नंतर परत मिळतील असा विश्वास तक्रारदाराला दिला. बँक खात्याचा कोरा धनादेश देऊन विश्वास संपादन केला. या भूलथापांना भुलून तक्रारदाराने टप्प्याटप्प्याने १६ लाख ८० हजार रुपये संबंधित खात्यांवर जमा केले.

फसवणूक उघडकीस कशी आली?

रक्कम भरल्यानंतर तक्रारदाराने प्रवेशाविषयी विचारणा सुरू केली. आरोपींनी तुमच्या मुलीचा प्रवेश निश्चित झाला असून तिची परीक्षा आणि गुणपत्रिकासुद्धा तयार आहे, असे सांगून वेळ मारून नेली. यावर संशय आल्याने तक्रारदाराने इतर आरोपींशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी प्रतिसाद देणे बंद केले.

याप्रकरणी तक्रारदाराने मुख्य आरोपीकडे पैसे परत मागितले असता त्याने सुरुवातीला आम्ही आपले पैसे परत करण्याचे आश्वासन दिले, पण नंतर त्यानेही संपर्क तोडला. अखेर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रारदाराने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांचा पुढील तपास सुरू…

या तक्रारीनंतर पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू आहे. पालकांनी अशा भूलथापा आणि फसवणुकीच्या जाळ्यात अडकू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Related Posts

शिक्षिकेच्या निष्काळजीपणामुळे बारावीचे पेपर जळाले; विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात….!

बारावी बोर्डाच्या परीक्षा नुकत्याच संपल्या असून, विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या तणावातून काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, निकालाबद्दलची चिंता अद्याप त्यांच्या मनात होतीच. बोर्डाच्या परीक्षांमध्ये उत्तरपत्रिकांची काळजीपूर्वक तपासणी केली जाते, परंतु काही शिक्षकांच्या…

शालेय विद्यार्थ्यांसाठी अमली पदार्थविरोधी शपथ – मंत्री चंद्रकांत पाटील

राज्यात वाढत्या अमली पदार्थांच्या वापराला आळा घालण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने शाळांमध्ये शपथ घेण्याचा उपक्रम राबवण्याचा विचार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत…

Leave a Reply

You Missed

नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुनर्जन्म? भाजपा खासदाराच्या विधानावर वादंग..!

नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुनर्जन्म? भाजपा खासदाराच्या विधानावर वादंग..!

सुनीता विल्यम्स पृथ्वीच्या दिशेने; अखेर नऊ महिन्यानंतर परतीचा प्रवास सुरू…!

सुनीता विल्यम्स पृथ्वीच्या दिशेने; अखेर नऊ महिन्यानंतर परतीचा प्रवास सुरू…!

नागपुरमध्ये दगडफेक, जाळपोळ आणि अफवा ; नितीन गडकरींचे नागरिकांना शांततेचे आवाहन !

नागपुरमध्ये दगडफेक, जाळपोळ आणि अफवा ; नितीन गडकरींचे नागरिकांना शांततेचे आवाहन !

दंगलीचे सावट! महालमधील हिंसाचाराने नागपूर सतर्क…

दंगलीचे सावट! महालमधील हिंसाचाराने नागपूर सतर्क…

नागपूर महालमध्ये दोन गटांमध्ये तणाव; दगडफेक, वाहनांची तोडफोड

नागपूर महालमध्ये दोन गटांमध्ये तणाव; दगडफेक, वाहनांची तोडफोड

इतिहास जिवंत करणारे भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन..!

इतिहास जिवंत करणारे भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन..!

“मी मराठी – अभिमान महाराष्ट्राचा”-आंबोली येथे आयोजित भव्य दिव्य शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न..!

“मी मराठी – अभिमान महाराष्ट्राचा”-आंबोली येथे आयोजित भव्य दिव्य शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न..!

राज ठाकरेंच्या शिवजयंतीनिमित्त संदेशात प्रेरणादायी विचार…!

राज ठाकरेंच्या शिवजयंतीनिमित्त संदेशात प्रेरणादायी विचार…!

फरहान आझमी यांची काँग्रेसच्या शिस्तभंग समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

फरहान आझमी यांची काँग्रेसच्या शिस्तभंग समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती