शालेय विद्यार्थ्यांसाठी अमली पदार्थविरोधी शपथ – मंत्री चंद्रकांत पाटील

राज्यात वाढत्या अमली पदार्थांच्या वापराला आळा घालण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने शाळांमध्ये शपथ घेण्याचा उपक्रम राबवण्याचा विचार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हा निर्णय जाहीर केला.

अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबद्दल विद्यार्थ्यांना अधिक जागरूक करण्यासाठी शालेय प्रार्थनेवेळी विशेष शपथ घेतली जाणार आहे. या शपथेमध्ये, मी कोणत्याही प्रकारची नशा करणार नाही आणि माझ्या आजूबाजूला जर अशा पदार्थांचा वापर होताना दिसला, तर मी त्वरित शिक्षक पालकांना कळवेन,” अशा प्रकारचा आशय असणार आहे. तसेच, प्रत्येक वर्गात दररोज दहा मिनिटे एका शिक्षकाने अमली पदार्थांचे दुष्परिणाम यावर मार्गदर्शन करावे, असा प्रस्ताव शिक्षण विभागाकडे सादर करण्यात आला आहे.

जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी आणि कायदासुव्यवस्था मजबूत करण्याच्या दृष्टीने प्रशासन विशेष पावले उचलत आहे. अल्पवयीन मुलांचा वाढता सहभाग चिंतेचा विषय असल्यामुळे आवश्यक त्या कायद्यात सुधारणा करण्यावर सरकार गांभीर्याने विचार करत आहे.

गुन्हेगारी रोखण्यासाठी जिल्ह्यात अतिरिक्त पोलीस अधिक्षकांच्या अध्यक्षतेखाली सहा उपअधिक्षकांची कृती समिती स्थापन करण्यात आली असून, आठवडाभरात हा टास्क फोर्स आपला अहवाल सादर करेल. पोलिसांना आवश्यक सुविधा पुरवण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून मदत केली जाणार असल्याचेही मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.

या पत्रकार परिषदेला आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, तसेच भाजप जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे आदी उपस्थित होते.

Related Posts

शिक्षिकेच्या निष्काळजीपणामुळे बारावीचे पेपर जळाले; विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात….!

बारावी बोर्डाच्या परीक्षा नुकत्याच संपल्या असून, विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या तणावातून काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, निकालाबद्दलची चिंता अद्याप त्यांच्या मनात होतीच. बोर्डाच्या परीक्षांमध्ये उत्तरपत्रिकांची काळजीपूर्वक तपासणी केली जाते, परंतु काही शिक्षकांच्या…

डोंबिवली: एमबीबीएस प्रवेशाचे आमिष दाखवून १६ लाखांची फसवणूक !

शासकीय कोट्यातून MBBS प्रवेश मिळवून देतो असे आमिष दाखवून बदलापूर आणि उल्हासनगरमधील तीन व्यक्तींनी डोंबिवली एमआयडीसी परिसरातील एका नागरिकाची तब्बल १६ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केली. ही रक्कम उकळूनही…

Leave a Reply

You Missed

नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुनर्जन्म? भाजपा खासदाराच्या विधानावर वादंग..!

नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुनर्जन्म? भाजपा खासदाराच्या विधानावर वादंग..!

सुनीता विल्यम्स पृथ्वीच्या दिशेने; अखेर नऊ महिन्यानंतर परतीचा प्रवास सुरू…!

सुनीता विल्यम्स पृथ्वीच्या दिशेने; अखेर नऊ महिन्यानंतर परतीचा प्रवास सुरू…!

नागपुरमध्ये दगडफेक, जाळपोळ आणि अफवा ; नितीन गडकरींचे नागरिकांना शांततेचे आवाहन !

नागपुरमध्ये दगडफेक, जाळपोळ आणि अफवा ; नितीन गडकरींचे नागरिकांना शांततेचे आवाहन !

दंगलीचे सावट! महालमधील हिंसाचाराने नागपूर सतर्क…

दंगलीचे सावट! महालमधील हिंसाचाराने नागपूर सतर्क…

नागपूर महालमध्ये दोन गटांमध्ये तणाव; दगडफेक, वाहनांची तोडफोड

नागपूर महालमध्ये दोन गटांमध्ये तणाव; दगडफेक, वाहनांची तोडफोड

इतिहास जिवंत करणारे भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन..!

इतिहास जिवंत करणारे भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन..!

“मी मराठी – अभिमान महाराष्ट्राचा”-आंबोली येथे आयोजित भव्य दिव्य शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न..!

“मी मराठी – अभिमान महाराष्ट्राचा”-आंबोली येथे आयोजित भव्य दिव्य शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न..!

राज ठाकरेंच्या शिवजयंतीनिमित्त संदेशात प्रेरणादायी विचार…!

राज ठाकरेंच्या शिवजयंतीनिमित्त संदेशात प्रेरणादायी विचार…!

फरहान आझमी यांची काँग्रेसच्या शिस्तभंग समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

फरहान आझमी यांची काँग्रेसच्या शिस्तभंग समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती