युक्रेनचा रशियावर मोठा हल्ला – शांतता चर्चेच्या आधीच जेलेंस्कींकडून दगा?

रशिया आणि युक्रेनमध्ये तीन वर्षांपासून सुरू असलेलं युद्ध थांबवण्यासाठी शांतता चर्चेची तयारी सुरू आहे. यासाठी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर जेलेंस्की, अमेरिकेचे मंत्री मार्को रुबियो आणि रशियाचे प्रतिनिधी सौदी अरेबियात पोहोचले आहेत.

मात्र, या चर्चेच्या आधीच मंगळवारी युक्रेनने मॉस्कोवर मोठ्या प्रमाणावर ड्रोन हल्ला केला. या हल्ल्यात रशियाची राजधानी मॉस्को तसेच जवळच्या काही शहरांना लक्ष्य करण्यात आले. एकाच वेळी अनेक ड्रोन हल्ले झाल्यामुळे मॉस्कोतील सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. रशियन वायुसेनेने अनेक ड्रोन नष्ट केल्याचा दावा केला असला तरी, काही ड्रोन लक्ष्यावर आदळल्याची माहिती समोर आली आहे.

या हल्ल्यातील नुकसान किती.?

रशियन संरक्षण खात्याच्या माहितीनुसार, जवळपास ७० ड्रोन हल्ले करण्यात आले. त्यातील ५८ ड्रोन रशियन हवाई संरक्षण प्रणालीने नष्ट केले, मात्र काही ड्रोन रहिवासी इमारतींवर आदळल्यामुळे काही ठिकाणी नुकसान झाले आहे. या हल्ल्यांमुळे मॉस्को विमानतळ काही काळासाठी बंद ठेवण्यात आला असून, अनेक उड्डाणे प्रभावित झाली आहेत. या हल्ल्यांमुळे शांतता चर्चेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

रशिया-युक्रेन युद्धातील निर्णायक टप्पा

तीन वर्षांपासून सुरू असलेल्या या युद्धाच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियात शांतता चर्चेचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चेत शस्त्रसंधी करारावर सहमती होण्याची शक्यता आहे. अमेरिकन आणि रशियन अधिकाऱ्यांमध्ये या आधीच चर्चेच्या काही फेऱ्या पार पडल्या आहेत, मात्र ही बैठक निर्णायक ठरणार असल्याचे बोलले जात आहे. कारण, यावेळी राष्ट्राध्यक्ष जेलेंस्की स्वतः चर्चेसाठी उपस्थित आहेत.

सौदी अरेबियाच्या भूमिकेचे कौतुक

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेंस्की मंगळवारी सौदी अरेबियात पोहोचले. त्यांचे सौदी अरबचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी स्वागत केले. जेद्दा येथे रवाना होण्यापूर्वी, जेलेंस्की यांनी शांतता चर्चेसाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल सौदी अरेबियाचे आभार मानले. मध्यस्थतेसाठी मोहम्मद बिन सलमान यांच्या भूमिकेचे त्यांनी विशेष कौतुक केले.

रशिया-युक्रेन युद्धात आतापर्यंत युक्रेनला मोठा भूभाग गमवावा लागला आहे. दोन्ही देशांच्या हजारो सैनिकांनी या युद्धात प्राण गमावले आहेत. त्यामुळे ही शांतता चर्चा युद्ध थांबवण्यासाठी निर्णायक ठरेल का, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

Related Posts

सुनीता विल्यम्स पृथ्वीच्या दिशेने; अखेर नऊ महिन्यानंतर परतीचा प्रवास सुरू…!

नऊ महिन्यांच्या दीर्घ मुक्कामानंतर नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांनी अखेर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) सोडले असून, त्यांचा पृथ्वीवर परतीचा प्रवास सुरू झाला आहे. सुरुवातीला हा प्रवास केवळ…

भारतीय वंशाच्या बालेश धनखडला ऑस्ट्रेलियात ४० वर्षांची शिक्षा – बलात्कारासह ३९ गुन्ह्यांत दोषी..!

ऑस्ट्रेलियातील भारतीय समुदायाचा माजी नेता आणि एकेकाळचा ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ भाजपाचा (OFBJP) सक्रिय सदस्य बालेश धनखड याला १३ बलात्कार आणि एकूण ३९ गुन्ह्यांत दोषी ठरवल्यानंतर ४० वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात…

Leave a Reply

You Missed

नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुनर्जन्म? भाजपा खासदाराच्या विधानावर वादंग..!

नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुनर्जन्म? भाजपा खासदाराच्या विधानावर वादंग..!

सुनीता विल्यम्स पृथ्वीच्या दिशेने; अखेर नऊ महिन्यानंतर परतीचा प्रवास सुरू…!

सुनीता विल्यम्स पृथ्वीच्या दिशेने; अखेर नऊ महिन्यानंतर परतीचा प्रवास सुरू…!

नागपुरमध्ये दगडफेक, जाळपोळ आणि अफवा ; नितीन गडकरींचे नागरिकांना शांततेचे आवाहन !

नागपुरमध्ये दगडफेक, जाळपोळ आणि अफवा ; नितीन गडकरींचे नागरिकांना शांततेचे आवाहन !

दंगलीचे सावट! महालमधील हिंसाचाराने नागपूर सतर्क…

दंगलीचे सावट! महालमधील हिंसाचाराने नागपूर सतर्क…

नागपूर महालमध्ये दोन गटांमध्ये तणाव; दगडफेक, वाहनांची तोडफोड

नागपूर महालमध्ये दोन गटांमध्ये तणाव; दगडफेक, वाहनांची तोडफोड

इतिहास जिवंत करणारे भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन..!

इतिहास जिवंत करणारे भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन..!

“मी मराठी – अभिमान महाराष्ट्राचा”-आंबोली येथे आयोजित भव्य दिव्य शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न..!

“मी मराठी – अभिमान महाराष्ट्राचा”-आंबोली येथे आयोजित भव्य दिव्य शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न..!

राज ठाकरेंच्या शिवजयंतीनिमित्त संदेशात प्रेरणादायी विचार…!

राज ठाकरेंच्या शिवजयंतीनिमित्त संदेशात प्रेरणादायी विचार…!

फरहान आझमी यांची काँग्रेसच्या शिस्तभंग समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

फरहान आझमी यांची काँग्रेसच्या शिस्तभंग समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती