धंगेकरांचा राजकीय पलटवार! काँग्रेसला सोडचिठ्ठी, शिंदेगटात नव्या इनिंगची तयारी…

काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी अखेर काँग्रेसला रामराम केला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या पक्षत्यागाच्या चर्चा सुरू होत्या, त्या आता खऱ्या ठरल्या आहेत. पुण्यात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा जाहीर केला.

पक्ष सोडण्याचा निर्णय कठीण, पण आवश्यक

धंगेकर म्हणाले, “गेल्या १०-१२ वर्षांत काँग्रेससोबत माझं कुटुंबासारखं नातं तयार झालं. पक्षातील सहकाऱ्यांनी मला मोठं प्रेम दिलं, माझ्या पाठीशी ताकद उभी केली. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्यांच्याच पाठिंब्यावर लढलो, जरी निकाल प्रतिकूल लागला तरीही कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी खूप मेहनत घेतली. त्यामुळे पक्ष सोडण्याचा निर्णय घेणं माझ्यासाठी अत्यंत कठीण होतं.”

सत्ता नसल्यास जनतेची कामं अपूर्ण

आपल्या निर्णयामागील कारण स्पष्ट करताना ते म्हणाले, “लोकशाहीत सत्ता नसल्यास सर्वसामान्य जनतेची कामं करणं कठीण होतं. मतदारसंघातील लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रभावी भूमिका बजावण्यासाठी मी नवीन मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला.”

शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश निश्चित

धंगेकर पुढे म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा केल्यानंतर मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी माझ्या मतदारसंघातील विकासकामांना मदत केली होती. त्यांचा जनसामान्यांमध्ये मोठा विश्वास आहे. त्यामुळे मी संध्याकाळी त्यांना भेटून पुढील निर्णय जाहीर करेन.”

यामुळे पुण्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून, धंगेकर यांच्या शिवसेना (शिंदे गट) प्रवेशाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • Related Posts

    नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुनर्जन्म? भाजपा खासदाराच्या विधानावर वादंग..!

    लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण ईश्वरीय आदेशाने आलो असल्याचं विधान केलं होतं. त्यावर मोठी चर्चा आणि विरोधकांकडून टीका झाली होती. त्याच पार्श्वभूमीवर आता भाजपाचे ओडिशातील खासदार प्रदीप पुरोहित…

    फरहान आझमी यांची काँग्रेसच्या शिस्तभंग समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

    नवी दिल्ली – ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने महत्त्वाचा निर्णय घेत डिसिप्लिनरी ऍक्शन कमिटीच्या (शिस्तभंग समिती) अध्यक्षपदी फरहान आझमी यांची नियुक्ती जाहीर केली आहे. पक्ष संघटनेत शिस्त व नियोजनबद्धता राखण्यासाठी ही…

    Leave a Reply

    You Missed

    नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुनर्जन्म? भाजपा खासदाराच्या विधानावर वादंग..!

    नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुनर्जन्म? भाजपा खासदाराच्या विधानावर वादंग..!

    सुनीता विल्यम्स पृथ्वीच्या दिशेने; अखेर नऊ महिन्यानंतर परतीचा प्रवास सुरू…!

    सुनीता विल्यम्स पृथ्वीच्या दिशेने; अखेर नऊ महिन्यानंतर परतीचा प्रवास सुरू…!

    नागपुरमध्ये दगडफेक, जाळपोळ आणि अफवा ; नितीन गडकरींचे नागरिकांना शांततेचे आवाहन !

    नागपुरमध्ये दगडफेक, जाळपोळ आणि अफवा ; नितीन गडकरींचे नागरिकांना शांततेचे आवाहन !

    दंगलीचे सावट! महालमधील हिंसाचाराने नागपूर सतर्क…

    दंगलीचे सावट! महालमधील हिंसाचाराने नागपूर सतर्क…

    नागपूर महालमध्ये दोन गटांमध्ये तणाव; दगडफेक, वाहनांची तोडफोड

    नागपूर महालमध्ये दोन गटांमध्ये तणाव; दगडफेक, वाहनांची तोडफोड

    इतिहास जिवंत करणारे भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन..!

    इतिहास जिवंत करणारे भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन..!

    “मी मराठी – अभिमान महाराष्ट्राचा”-आंबोली येथे आयोजित भव्य दिव्य शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न..!

    “मी मराठी – अभिमान महाराष्ट्राचा”-आंबोली येथे आयोजित भव्य दिव्य शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न..!

    राज ठाकरेंच्या शिवजयंतीनिमित्त संदेशात प्रेरणादायी विचार…!

    राज ठाकरेंच्या शिवजयंतीनिमित्त संदेशात प्रेरणादायी विचार…!

    फरहान आझमी यांची काँग्रेसच्या शिस्तभंग समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

    फरहान आझमी यांची काँग्रेसच्या शिस्तभंग समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती