
टेक्नोसॅव्ही युगात सगळ्यात मोठा तांत्रिक बदल म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI). आज AI केवळ विज्ञानकथांपुरती मर्यादित न राहता आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. आरोग्य, शिक्षण, बँकिंग, वाहतूक, ग्राहक सेवा अशा अनेक क्षेत्रांत AI मुळे वेगवान निर्णय, अचूक विश्लेषण आणि कमी वेळेत कार्यक्षमता वाढली आहे. मात्र याचसोबत “AI मुळे लाखो नोकऱ्या जातील” हा धोका देखील व्यक्त केला.
AI प्रणाली विशिष्ट कामे खूप कमी वेळात व अचूकपणे करू शकते. उदाहरणार्थ, मोठ्या डेटाचं विश्लेषण, ग्राहकांच्या सवयी ओळखणे, वैद्यकीय निदानासाठी डेटा स्कॅन करणे. तसेच
जरी काही पारंपरिक नोकऱ्या कालबाह्य होत असल्या तरी AI च्या वापरामुळे डेटा अॅनालिस्ट, मशीन लर्निंग इंजिनिअर, AI ट्रेनर, रोबोटिक्स स्पेशालिस्ट अशा नव्या प्रोफाइल्स निर्माण होत आहेत. याचबरोबर उत्पादन प्रक्रियेत AI वापरल्यामुळे यंत्रसामग्री कमी त्रुटींसह काम करते. ऑटोमेशनमुळे खर्च कमी होतो आणि उत्पादनाचा दर्जा सुधारतो. हे फायदे झाले आहेत.
तर याउलट बँकिंग, ग्राहक सेवा, कस्टमर सपोर्ट, ट्रान्सलेशन, डेटा एंट्री, ड्रायव्हिंग यांसारख्या नोकऱ्या AI मुळे धोक्यात येत आहेत. उदाहरणार्थ, काही कंपन्यांनी chatbot वापरून कॉल सेंटरमध्ये मानवबळ कमी केलं आहे. तसेच भारतात अजूनही मोठा वर्ग तांत्रिकदृष्ट्या अद्ययावत नाही. AI क्षेत्रात काम करण्यासाठी विशेष प्रशिक्षण आणि अभ्यास आवश्यक आहे. त्यामुळे सध्या असलेल्या कामगार वर्गाला त्वरित नवीन कौशल्ये आत्मसात करावी लागतात आणि काही क्षेत्रांत मानवी विचारांची, करुणेची, नैतिकतेची गरज असते. AI अजूनही या मानवी भावनांची समज फारशी विकसित करू शकलेली नाही. त्यामुळे शिक्षण, मानसोपचार, समाजसेवा अशा क्षेत्रांत AI ची मर्यादा आहे.
AI चा स्वीकार करताना त्यासोबत मानवकेंद्रित दृष्टिकोन ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. भविष्यातील रोजगार सुरक्षित ठेवण्यासाठी खालील उपाय महत्त्वाचे ठरू शकतात:
•कौशल्य विकासावर भर: शिक्षणसंस्थांनी AI संबंधित अभ्यासक्रम चालू करावेत.
•संवेदनशील नोकऱ्यांचे संरक्षण: अशा नोकऱ्या ज्या फक्त मानवी भावनांवर अवलंबून आहेत, त्या सुरक्षित राहतील.
•AI चे नैतिक उपयोग: AI वापरताना गोपनीयता, भेदभाव विरहितता आणि पारदर्शकता राखणे आवश्यक आहे.
AI ही काळाची गरज आहे. ती संधी देखील आहे आणि धोका देखील – सर्वस्वी आपल्यावर आहे आपण ती कशी वापरतो. युवकांनी पारंपरिक नोकऱ्यांपेक्षा नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून स्वतःला भविष्यासाठी तयार करणे गरजेचे आहे. सरकार, उद्योग, शिक्षण संस्था आणि युवक – सर्वांनी मिळून एक समतोल, समावेशक आणि शाश्वत तंत्रज्ञान आधारित समाज घडवण्याचा प्रयत्न करायला हवा.