
सध्या महाराष्ट्रात कॉमेडियन कुणाल कामरा चर्चेचा विषय बनला आहे पण याआधी त्याच्यावर अनेक वेळा टीका झाली आहे. खासकरून त्याच्या व्हिडिओंमुळे आणि सोशल मीडियावर केलेल्या टिप्पणीमुळे टीका करण्यात आलेली आहे. त्यातील काही प्रमुख उदाहरणे बघायची झाली तर
कुणाल कामरा ने अर्णब गोस्वामी यांच्या कार्यक्रमाच्या संदर्भात अनेक वेळा सॅटायर केले आहे. एका व्हिडिओमध्ये त्याने अर्णब गोस्वामी यांच्या आवाजाचा चेष्टा केली होती, ज्यामुळे त्या वक्तव्यावर त्याला सोशल मीडिया आणि मिडियामध्ये वाद निर्माण झाला होता. कुणाल कामरा याच्या अनेक स्टँड-अप कॉमेडी आणि सोशल मीडिया पोस्ट्स मध्ये, तो देशातील राजकीय परिस्थितीवर तसेच सत्ताधाऱ्यांवर टीका करत असतो. त्याच्या या टीकेमुळे तो त्याच्या विरोधकांकडून आणि सत्ताधारी पक्षांकडून आलोचला गेला आहे. यामुळे कुणाल कामरा यावर ट्विटरने काही काळ बंदी घातली होती. २०२१ मध्ये, त्याने काही ट्विट्स केले होते, ज्यावर ट्विटरने त्याची अकाउंट तात्पुरती निलंबित केली. ही घटना देखील त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर चर्चा आणि टीका निर्माण करणारी ठरली होती.
आजच्या घडीला कुणाल कामरा यांनी त्यात केलेल्या गाण्यामुळे शिंदे गटाकडून त्याच्यावर जोरदार टीका होत आहे. त्याचे ऑफिस देखील फोडण्यात आले आहे. एवढं होऊन देखील कामराने कोणत्याही प्रकारे माघार घेतली नसून मी भारतीय संविधान मानतो आणि मला माझ्या राज्यघटनेने बोलण्याचा अधिकार दिला असल्याचं वक्तव्य कामराने केले आहे. यावर महाराष्ट्रातील राजकारण अजून कोणतं नवीन वळण घेणार हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे.