राज ठाकरेंचा भय्याजी जोशींवर हल्लाबोल: “या असल्या काड्या घालून…”

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्या वक्तव्यावर मोठा वाद निर्माण झाला आहे. मुंबईत एका कार्यक्रमात भाषण करताना त्यांनी “मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी येणं गरजेचं नाही” असे विधान केले. या वक्तव्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार टीका केली असून, भारतीय जनता पक्षाने यावर स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी केली आहे.

राज ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया

राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून भय्याजी जोशींवर हल्लाबोल केला. त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळ, भाषावार प्रांतरचना आणि १०६ हुतात्म्यांच्या बलिदानाचा उल्लेख करत, “भय्याजींनी हे विधान बंगळुरू किंवा चेन्नईत जाऊन करून दाखवावे,” असे म्हटले. तसेच, “भय्याजी जोशी यांच्या विधानाशी महाराष्ट्रातील भाजपा सहमत आहे का?” असा थेट सवालही त्यांनी केला.

“मराठी जनता दुधखुळी नाही!”

राज ठाकरे पुढे म्हणाले, “मुंबई आणि एमएमआर परिसरातील विकासाच्या आड काही राजकीय हेतू लपलेले आहेत. हे काय चाललंय हे जनता समजून आहे. स्वतः मराठी असूनही जोशींनी हे विधान करणे दुर्दैवी आहे.”

तसेच, “ब्रिटिश गायक ख्रिस मार्टिनसुद्धा मुंबईत येऊन मराठीत बोलतो, मग जोशींना मुंबईची भाषा समजत नाही का? हे राजकीय हेतूशिवाय होत नाही,” असा आरोपही त्यांनी केला. “या असल्या काड्या घालून नवा संघर्ष निर्माण करू नका!” असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.

“गुढीपाडव्याला सविस्तर बोलेन!”

या संपूर्ण प्रकरणावर राज ठाकरे ३० मार्च रोजी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात अधिक सविस्तर भूमिका मांडणार असल्याचे त्यांनी सूचित केले आहे. “मनसे या विधानाचा निषेध नोंदवत आहे आणि मराठी माणूस हे विसरणार नाही!” असे त्यांनी आपल्या पोस्टच्या शेवटी नमूद केले.

भय्याजी जोशींचे नेमके वक्तव्य काय?

विद्याविहारमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना भय्याजी जोशी म्हणाले, “मुंबईला एक ठराविक भाषा नाही. येथे अनेक भाषा बोलल्या जातात. घाटकोपरमध्ये गुजराती, गिरगावात मराठी, तर इतर ठिकाणी हिंदी बोलणारे लोक दिसतात. त्यामुळे मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे, असे नाही.”

भय्याजी जोशी यांच्या या विधानावरून राजकीय वातावरण तापले असून, भाजपा यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Posts

झटका मटण विक्रीसाठी मल्हार सर्टिफिकेटचा प्रस्ताव त्वरित रद्द करावा, महाराष्ट्र क्रांती संघटनेचे मुख्यमंत्री यांना निवेदन !

महाराष्ट्र क्रांती संघटनेने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक निवेदन सादर करून झटका मटण विक्रीसाठी देण्यात येणाऱ्या मल्हार सर्टिफिकेटचा प्रस्ताव त्वरित रद्द करण्याची मागणी केली आहे. मंत्री नितेश राणे यांनी…

नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुनर्जन्म? भाजपा खासदाराच्या विधानावर वादंग..!

लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण ईश्वरीय आदेशाने आलो असल्याचं विधान केलं होतं. त्यावर मोठी चर्चा आणि विरोधकांकडून टीका झाली होती. त्याच पार्श्वभूमीवर आता भाजपाचे ओडिशातील खासदार प्रदीप पुरोहित…

Leave a Reply

You Missed

ऑपरेशन सिंदूर: भारताचा निर्णायक प्रहार, पाकिस्तान हादरला; पाक नागरिकाची थेट कबुली – “खरंच घुसून मारलं!”

ऑपरेशन सिंदूर: भारताचा निर्णायक प्रहार, पाकिस्तान हादरला; पाक नागरिकाची थेट कबुली – “खरंच घुसून मारलं!”

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान आक्रमक; भारतातील १५ जिल्ह्यांवर हायअलर्ट

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान आक्रमक; भारतातील १५ जिल्ह्यांवर हायअलर्ट

मुंबई-ठाण्यात अचानक रेन स्ट्राईक; चाकरमान्यांची तारांबळ, लोकल सेवा विस्कळीत !

मुंबई-ठाण्यात अचानक रेन स्ट्राईक; चाकरमान्यांची तारांबळ, लोकल सेवा विस्कळीत !

दहशतवाद्यांना कठोर शिक्षा हवी, पण युद्ध हा उपाय नाही – राज ठाकरे यांची एअर स्ट्राइकवर प्रतिक्रिया

दहशतवाद्यांना कठोर शिक्षा हवी, पण युद्ध हा उपाय नाही – राज ठाकरे यांची एअर स्ट्राइकवर प्रतिक्रिया

ऑपरेशन सिंदूरनंतर मोदींचं पहिलं जाहीर वक्तव्य – “2040 पर्यंत चंद्रावर भारतीय पाऊल असेल”

ऑपरेशन सिंदूरनंतर मोदींचं पहिलं जाहीर वक्तव्य – “2040 पर्यंत चंद्रावर भारतीय पाऊल असेल”

ऑपरेशन सिंदूर: भारताची पाकमध्ये धडक कारवाई; पाकिस्तानात भीतीचे वातावरण, शाळा-विमानतळ बंद

ऑपरेशन सिंदूर: भारताची पाकमध्ये धडक कारवाई; पाकिस्तानात भीतीचे वातावरण, शाळा-विमानतळ बंद

ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या ९ तळांवर भारताची अचूक एअर स्ट्राईक…

ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या ९ तळांवर भारताची अचूक एअर स्ट्राईक…

भारत-पाकिस्तान संघर्ष शिगेला! मॉक ड्रिलनंतर थेट युद्ध..?

भारत-पाकिस्तान संघर्ष शिगेला! मॉक ड्रिलनंतर थेट युद्ध..?

महाराष्ट्रात ७ मे रोजी मॉक ड्रील; युद्धजन्य परिस्थितीची रंगीत तालीम..!

महाराष्ट्रात ७ मे रोजी मॉक ड्रील; युद्धजन्य परिस्थितीची रंगीत तालीम..!