fbpx

राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात? पाच वर्षांत ५५ हजारहून अधिक निमलष्करी जवानांनी घेतली स्वेच्छानिवृत्ती, ७३० जवानांची आत्महत्या

नवी दिल्ली: मागील पाच वर्षांत राष्ट्रीय सुरक्षा गार्ड (NSG), केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (CAPF), आणि आसाम रायफलचे ५५,५५५ जवान विविध कारणांनी सेवेतून बाहेर पडले आहेत. यामध्ये ४७,८९१ जवानांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली असून ७,६६४ जवानांनी राजीनामा दिला आहे. त्याचप्रमाणे, ७३० जवानांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत खासदार मुकुल वासनिक यांना दिलेल्या लेखी उत्तराद्वारे ही माहिती उघड केली.

सेवेतील ताणतणावाचे मुख्य कारणे

सततच्या तणावपूर्ण सेवा, कुटुंबापासून दूर राहणे, अपुरी विश्रांती, कमी पगार, आणि सेवेतली असुरक्षितता ही जवानांच्या स्वेच्छानिवृत्ती आणि आत्महत्यांचे संभाव्य कारणे मानली जात आहेत.

मानसिक ताणाचा वाढता परिणाम

जवानांच्या मानसिक तणावावर त्वरित उपाय करण्याची आवश्यकता आहे. तणाव दूर करण्यासाठी मानसिक आरोग्य सल्लागार नेमणे, कुटुंबीयांसोबत अधिक वेळ घालवण्यासाठी विशेष सवलती, सुट्ट्या, आणि वेतनवाढ यासारख्या उपायांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.

राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका

देशाच्या सुरक्षेसाठी जीवाची बाजी लावणाऱ्या जवानांच्या समस्यांकडे सरकारने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. जवानांच्या समस्या सोडवण्यात उशीर झाल्यास, याचा राष्ट्रीय सुरक्षेवर गंभीर परिणाम होऊ शकतो.

सरकारकडून या मुद्द्यांवर तत्काळ लक्ष देणे अपेक्षित आहे, जेणेकरून जवानांचा आत्मविश्वास वाढेल आणि देशाच्या सुरक्षा व्यवस्थेत स्थिरता येईल.

  • Related Posts

    दिल्ली उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय: बलात्कार आणि ॲसिड हल्ल्यांतील पीडितांना मोफत उपचार मिळणार

    नवी दिल्ली: दिल्ली उच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले आहे की, सर्व सरकारी तसेच खासगी रुग्णालये, क्लिनिक आणि नर्सिंग होम बलात्कार आणि ॲसिड हल्ल्यांतील पीडितांना आवश्यक वैद्यकीय उपचार देण्यास नकार देऊ शकत…

    जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन

    जगप्रसिद्ध तबलावादक आणि पद्मविभूषण पुरस्कार विजेते उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन झाले आहे. सॅन फ्रान्सिस्को येथे उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. संगीत क्षेत्रात अमूल्य योगदान दिलेल्या उस्ताद झाकीर हुसेन यांचा…

    Leave a Reply

    You Missed

    कोहलीने गमावला चाहत्यांचा विश्वास? सोशल मीडियावर संताप

    कोहलीने गमावला चाहत्यांचा विश्वास? सोशल मीडियावर संताप

    मालाड: चिकुवाडी स्वप्नातील घर उद्ध्वस्त करणारी लुटारू व्यवस्था

    मालाड: चिकुवाडी स्वप्नातील घर उद्ध्वस्त करणारी लुटारू व्यवस्था

    दूध भेसळ: आरोग्यावर गंभीर संकट

    दूध भेसळ: आरोग्यावर गंभीर संकट

    चौथ्या स्तंभाच्या ढासळत्या प्रतिष्ठेचा प्रश्न पत्रकार झाला कामगार: चौथ्या स्तंभाच्या ढासळत्या प्रतिष्ठेचा प्रश्न

    चौथ्या स्तंभाच्या ढासळत्या प्रतिष्ठेचा प्रश्न पत्रकार झाला कामगार: चौथ्या स्तंभाच्या ढासळत्या प्रतिष्ठेचा प्रश्न

    दिल्ली उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय: बलात्कार आणि ॲसिड हल्ल्यांतील पीडितांना मोफत उपचार मिळणार

    दिल्ली उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय: बलात्कार आणि ॲसिड हल्ल्यांतील पीडितांना मोफत उपचार मिळणार

    हैदराबादमध्ये पुष्पा २ प्रीमियरमुळे चेंगराचेंगरी; अल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला

    हैदराबादमध्ये पुष्पा २ प्रीमियरमुळे चेंगराचेंगरी; अल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला

    केंद्रीय मंत्री रामदास आठवले एन.डी.ए व महायुतीवर नाराज! अधिवेशन अर्धवट सोडून दुबईला सहकुटुंब रवाना

    केंद्रीय मंत्री रामदास आठवले एन.डी.ए व महायुतीवर नाराज! अधिवेशन अर्धवट सोडून दुबईला सहकुटुंब रवाना

    संपादकीय लेख: पोलिस प्रशासनाच्या बदलत्या भूमिकेची आवश्यकता

    संपादकीय लेख: पोलिस प्रशासनाच्या बदलत्या भूमिकेची आवश्यकता

    मालाड:धारवली गावातील ऐतिहासिक क्षण: अंधारावर मात, रस्ते उजळले!

    मालाड:धारवली गावातील ऐतिहासिक क्षण: अंधारावर मात, रस्ते उजळले!