लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी पुढच्या वर्षी भाऊबीजेपर्यंत वाट पाहावी लागणार? महायुती सरकारने लाडक्या बहिणीला दिला दगा..?

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठा विजय मिळवत २८८ पैकी तब्बल २३५ जागांवर विजय मिळवला आहे. पाच महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीत अपयशी ठरलेल्या महायुतीने यावेळी नियोजनबद्ध प्रचार व योग्य धोरणांमुळे विधानसभेत घवघवीत यश संपादन केले केले. दुसरीकडे, काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि त्यांच्या मित्रपक्षांना मिळूनही ५० जागा जिंकता आल्या नाहीत.

महायुतीच्या नेत्यांनी त्यांच्या या विजयाचे श्रेय लाडकी बहीण योजना या महिलांना आर्थिक लाभ देणाऱ्या योजनेला दिले आहे. राजकीय विश्लेषकांनीही या योजनेला यशामागील मुख्य कारण मानले आहे. निवडणुकीपूर्वी महायुतीने राज्यातील महिलांना दरमहा २,१०० रुपये थेट बँक खात्यात देण्याचे आश्वासन दिले होते. आता महायुती सत्तेत आल्यामुळे पात्र महिलांना या रकमेची प्रतीक्षा आहे.

मात्र, या योजनेतील हप्ता वेळेवर मिळणार की नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. राज्य सरकारने नोव्हेंबर महिन्यात हप्ता दिला जाईल असे जाहीर केले होते, परंतु नोव्हेंबर संपला तरी अद्याप रक्कम जमा झालेली नाही. अशातच भाजप नेते व महायुतीच्या जाहीरनामा समितीचे अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी दी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत या योजनेच्या अंमलबजावणीबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.

मुनगंटीवार यांच्या म्हणण्यानुसार, महिलांना २,१०० रुपये मिळण्यास ७ ते १० महिने लागण्याची शक्यता आहे. निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनानुसार वाढीव खर्चाचा विचार करत ही योजना राबवण्यासाठी अधिक वेळ लागू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे आता महिलांना प्रत्यक्ष लाभ कधी मिळेल याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.महिलांन मध्ये चर्चा आहे की महायुती ने फसवल..फक्त निवडणुकी साठी फसवू आश्वासन देण्यात आली.

  • Related Posts

    “महाराष्ट्रातील प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांवर कारवाई” – मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाम निर्णय

    महाराष्ट्रातील प्रार्थनास्थळे आणि मशिदींवरील भोंग्यांमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणावर कडक कारवाई केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. मुंबई उच्च न्यायालयाने २५ जानेवारी २०२५ रोजी आदेश जारी करून…

    मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया !

    बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याला मुख्य आरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे. त्याच्यासह…

    Leave a Reply

    You Missed

    सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?;आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

    सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?;आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

    शिक्षिकेच्या निष्काळजीपणामुळे बारावीचे पेपर जळाले; विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात….!

    शिक्षिकेच्या निष्काळजीपणामुळे बारावीचे पेपर जळाले; विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात….!

    “जागृत महाराष्ट्र न्यूज” मध्ये नवीन नियुक्त्या – गणेश भालेराव सह-संपादक तर सुभाष पगारे कायदे सल्लागार

    “जागृत महाराष्ट्र न्यूज” मध्ये नवीन नियुक्त्या – गणेश भालेराव सह-संपादक तर सुभाष पगारे कायदे सल्लागार

    “महाराष्ट्रातील प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांवर कारवाई” – मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाम निर्णय

    “महाराष्ट्रातील प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांवर कारवाई” – मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाम निर्णय

    वक्फची जागा, भाजपचा दबाव की राजकीय निर्णय? रवींद्र धंगेकर यांचे स्पष्टीकरण…

    वक्फची जागा, भाजपचा दबाव की राजकीय निर्णय? रवींद्र धंगेकर यांचे स्पष्टीकरण…

    युक्रेनचा रशियावर मोठा हल्ला – शांतता चर्चेच्या आधीच जेलेंस्कींकडून दगा?

    युक्रेनचा रशियावर मोठा हल्ला – शांतता चर्चेच्या आधीच जेलेंस्कींकडून दगा?

    “मारल्या होत्या थापा भारी, महाराष्ट्र कर्जबाजारी!” – उद्धव ठाकरेंची अर्थसंकल्पावर जोरदार टीका !

    “मारल्या होत्या थापा भारी, महाराष्ट्र कर्जबाजारी!” – उद्धव ठाकरेंची अर्थसंकल्पावर जोरदार टीका !

    गोरेगावमध्ये भीषण आग; अनेक झोपड्या, गोदामे आणि दुकाने जळून खाक

    गोरेगावमध्ये भीषण आग; अनेक झोपड्या, गोदामे आणि दुकाने जळून खाक

    चॅम्पियन्स ट्रॉफी 2025: भारताचा दणदणीत विजय, रोहित-विराटचा भरमैदानात दांडिया सेलिब्रेशन!

    चॅम्पियन्स ट्रॉफी 2025: भारताचा दणदणीत विजय, रोहित-विराटचा भरमैदानात दांडिया सेलिब्रेशन!