मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया !

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याला मुख्य आरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे. त्याच्यासह इतर सहा जणांनाही अटक झाली असून एक आरोपी अद्याप फरार आहे. या हत्याकांडाचे काही फोटो समोर आल्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली. यामुळे आरोपींना कठोर शिक्षा आणि धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली होती.

या पार्श्वभूमीवर, धनंजय मुंडे यांनी आज (४ मार्च) मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्याबद्दल बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “धनंजय मुंडे यांनी राजीनामा सादर केला असून तो मी स्वीकारला आहे. पुढील कार्यवाहीसाठी तो राज्यपालांकडे पाठवण्यात आला आहे.”

धनंजय मुंडे नेमकं काय म्हणाले?

राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया देत एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली. त्यांनी लिहिले, “माझी प्रकृती मागील काही दिवसांपासून ठीक नसल्याने डॉक्टरांनी उपचार घेण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, माझ्या सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे.”

या घडामोडींवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली. त्यांनी संक्षेपात सांगितले, “धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला आहे.”

Related Posts

इतिहास जिवंत करणारे भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन..!

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने भिवंडीमध्ये पहिल्या शिवमंदिराचे उद्घाटन सोमवारी मोठ्या उत्साहात पार पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात महाराजांच्या शौर्यगाथेचे दर्शन घडवणाऱ्या भव्य मंदिराचे लोकार्पण…

“महाराष्ट्रातील प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांवर कारवाई” – मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाम निर्णय

महाराष्ट्रातील प्रार्थनास्थळे आणि मशिदींवरील भोंग्यांमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणावर कडक कारवाई केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. मुंबई उच्च न्यायालयाने २५ जानेवारी २०२५ रोजी आदेश जारी करून…

Leave a Reply

You Missed

नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुनर्जन्म? भाजपा खासदाराच्या विधानावर वादंग..!

नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुनर्जन्म? भाजपा खासदाराच्या विधानावर वादंग..!

सुनीता विल्यम्स पृथ्वीच्या दिशेने; अखेर नऊ महिन्यानंतर परतीचा प्रवास सुरू…!

सुनीता विल्यम्स पृथ्वीच्या दिशेने; अखेर नऊ महिन्यानंतर परतीचा प्रवास सुरू…!

नागपुरमध्ये दगडफेक, जाळपोळ आणि अफवा ; नितीन गडकरींचे नागरिकांना शांततेचे आवाहन !

नागपुरमध्ये दगडफेक, जाळपोळ आणि अफवा ; नितीन गडकरींचे नागरिकांना शांततेचे आवाहन !

दंगलीचे सावट! महालमधील हिंसाचाराने नागपूर सतर्क…

दंगलीचे सावट! महालमधील हिंसाचाराने नागपूर सतर्क…

नागपूर महालमध्ये दोन गटांमध्ये तणाव; दगडफेक, वाहनांची तोडफोड

नागपूर महालमध्ये दोन गटांमध्ये तणाव; दगडफेक, वाहनांची तोडफोड

इतिहास जिवंत करणारे भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन..!

इतिहास जिवंत करणारे भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन..!

“मी मराठी – अभिमान महाराष्ट्राचा”-आंबोली येथे आयोजित भव्य दिव्य शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न..!

“मी मराठी – अभिमान महाराष्ट्राचा”-आंबोली येथे आयोजित भव्य दिव्य शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न..!

राज ठाकरेंच्या शिवजयंतीनिमित्त संदेशात प्रेरणादायी विचार…!

राज ठाकरेंच्या शिवजयंतीनिमित्त संदेशात प्रेरणादायी विचार…!

फरहान आझमी यांची काँग्रेसच्या शिस्तभंग समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

फरहान आझमी यांची काँग्रेसच्या शिस्तभंग समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती