‘सुरक्षा’ नावाखाली विकृती ; ४ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला अटक !

मुंबई, कांदिवली: कांदिवली पूर्व येथील समता नगर भागात एका चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याप्रकरणी एका ५० वर्षीय सुरक्षा रक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना बुधवारी संध्याकाळी घडली असून, आरोपी हा स्थानिक सभागृहात सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता.

पीडित मुलगी बुधवारी आपल्या मित्र-मैत्रिणींना सोबत घेऊन सभागृहात खेळत होती. त्याच वेळी तिथे उपस्थित असलेल्या आरोपीने तिला जवळ बोलावले आणि मांडीवर बसवून तिच्याशी अशोभनीय वर्तन केले. मुलगी लहान असल्याचा फायदा घेत आरोपीने तिच्याशी गैरवर्तन केल्याचे उघड झाले आहे.

घरी परतल्यावर त्या चिमुरडीनं आपल्या आईला हातवारे करत हा प्रकार समजावून सांगितला. आईने तात्काळ समता नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीविरुद्ध पोक्सो कायदा आणि भारतीय दंड संहिताच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला. गुरुवारी पहाटे पोलिसांच्या एका पथकाने आरोपीला त्याच्या राहत्या जागेतून अटक केली.

सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. आरोपीच्या पार्श्वभूमीचीही चौकशी केली जात आहे, आणि पोलिसांनी स्पष्ट केलं आहे की त्याच्यावर याआधी कोणताही गुन्हा नोंदलेला नव्हता.

अल्पवयीन मुलांविरोधात गुन्ह्यांमध्ये वाढ

मुंबईसारख्या मोठ्या शहरात अल्पवयीन (१८ वर्षांखालील) मुले आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे. २०२३ साली पोक्सो कायद्यान्वये १,१०८ गुन्हे नोंदवले गेले होते, तर २०२४ मध्ये ही संख्या वाढून १,३४१ झाली आहे.

या गुन्ह्यांमध्ये बलात्काराचे ६०९, विनयभंगाचे ६६७ आणि अश्लील शेरेबाजी व छेडछाडीचे ३५ प्रकार समाविष्ट आहेत. विशेष म्हणजे, अनेक प्रकरणांमध्ये आरोपी हे पीडितांना ओळखीचेच असतात.

२०२३ मध्ये पोलिसांनी ९९% प्रकरणे उघडकीस आणली होती, परंतु २०२४ मध्ये हे प्रमाण थोडे घटून ९६% झाले आहे. विनयभंग व छेडछाडप्रकरणी गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाणही थोडेसे कमी झाले आहे.

  • Related Posts

    उशीराचा शेवट: एका विद्यार्थ्याच्या आयुष्यावर पडलेली काळी छाया

    मार्च-एप्रिल महिन हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील सर्वात निर्णायक, ताणतणावाने भरलेला काळ. पालक, शिक्षक, आणि संपूर्ण समाज जिथे परीक्षेला अंतिम सत्य मानतो, तिथे एका विद्यार्थ्याच्या उशिरामुळे त्याचं आयुष्यच संपलं. ही केवळ घटना…

    “तुर्तास आंदोलन थांबवा!” – राज ठाकरे यांच्या पत्रामुळे मनसेमध्ये खळबळ; नेमकं प्रकरण काय?

    राज्यभरात सुरू असलेल्या मराठीच्या आंदोलनावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मराठी भाषेच्या वापरासाठी मनसेने बँकांमध्ये सुरू केलेल्या आंदोलनावर तूर्तास विराम देण्याचे आवाहन खुद्द…

    Leave a Reply

    You Missed

    उशीराचा शेवट: एका विद्यार्थ्याच्या आयुष्यावर पडलेली काळी छाया

    उशीराचा शेवट: एका विद्यार्थ्याच्या आयुष्यावर पडलेली काळी छाया

    पुणे मेट्रोचा नवा टप्पा जवळपास पूर्ण; हडपसर-शिवाजीनगर मार्ग प्रवाशांसाठी लवकरच खुला

    पुणे मेट्रोचा नवा टप्पा जवळपास पूर्ण; हडपसर-शिवाजीनगर मार्ग प्रवाशांसाठी लवकरच खुला

    नांदेड : ट्रॅक्टर विहिरीत कोसळून सात महिलांचा दुर्दैवी मृत्यू ; मृत कुटूंबियांना ५ लाखांची मदत

    नांदेड : ट्रॅक्टर विहिरीत कोसळून सात महिलांचा दुर्दैवी मृत्यू ; मृत कुटूंबियांना ५ लाखांची मदत

    ‘सुरक्षा’ नावाखाली विकृती ; ४ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला अटक !

    ‘सुरक्षा’ नावाखाली विकृती ; ४ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला अटक !

    तरुणाई ट्रेडिंगकडे वळतेय! भारतात शेअर मार्केट आणि क्रिप्टो गुंतवणुकीत वाढती रुची

    तरुणाई ट्रेडिंगकडे वळतेय! भारतात शेअर मार्केट आणि क्रिप्टो गुंतवणुकीत वाढती रुची

    नागपूर : सासरच्या छळाचा थरारक प्रकार, सुनेला विजेचा शॉक देत मारहाण

    नागपूर : सासरच्या छळाचा थरारक प्रकार, सुनेला विजेचा शॉक देत मारहाण

    “तुर्तास आंदोलन थांबवा!” – राज ठाकरे यांच्या पत्रामुळे मनसेमध्ये खळबळ; नेमकं प्रकरण काय?

    “तुर्तास आंदोलन थांबवा!” – राज ठाकरे यांच्या पत्रामुळे मनसेमध्ये खळबळ; नेमकं प्रकरण काय?

    “मराठीचा अपमान सहन केला जाणार नाही”; राज ठाकरेंच्या भेटीनंतर उदय सामंतांचा इशारा…!

    “मराठीचा अपमान सहन केला जाणार नाही”; राज ठाकरेंच्या भेटीनंतर उदय सामंतांचा इशारा…!

    गर्भवतीच्या मृत्यूवरून दीनानाथ रुग्णालयावर गंभीर आरोप; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश !

    गर्भवतीच्या मृत्यूवरून दीनानाथ रुग्णालयावर गंभीर आरोप; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश !