
गुढीपाडवाच्या भाषणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगजेबाच्या कबरीवर फलक लावण्याचा उल्लेख केला यावर तातडीने मनसे सरचिटणीस नयन प्रदीप कदम यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.
त्या पत्रात कदम म्हणाले “आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथेच गाडला” जेणेकरून आपल्या पुढच्या पिढीला आपला इतिहास किती महान आहे हे कळेल. छत्रपती शिवाजी महाराज हा एक विचार, जो कोणी संपवू शकला नाही उलट हा विचार करणारेच इथे संपले. म्हणून औरंगजेबाची एक साधी कबर ठेवावी व वरील सर्व सजावट काढून टाकावी आणि मराठ्यांचे शौर्य म्हणून प्रदर्शनास ठेवावी. तसेच एक सीसीटीव्ही लावण्यात यावा जेणेकरून जो कुणी त्या कबरेवर फुल चादर चढवण्यासाठी येईल त्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करता येईल. अशा औरंगजेबाच्या औलादींना इथेच ठेचणे गरजेच आहे. बस एवढी एक मागणी आहे की, महाराजांचे विचार, कीर्ती सर्वाना कळावी. आमच्या या मागणीचा विचार करून तातडीने अंमलबजाबणी करावी”
नयन कदम यांच्या मागणी पत्रावर मुख्यमंत्री काय पाऊल उचलणार यावर आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.