हिंदुजा फाउंडेशनचा दौंड SRPF कॅम्पसमधील उपक्रम दरवर्षी 124.85 दशलक्ष लिटर स्वच्छ पाणी वाचविणार

• SRPF कॅम्पस येथील 4,000 रहिवासी आणि 1,000 बिगर-रहिवाशांना लाभ

पुणे, 27 मार्च 2025: हिंदुजा ग्रुपची 110 वर्षे जुनी समाजाभिमुख काम करणारी शाखा हिंदुजा फाउंडेशनने आपल्या प्रमुख जल जीवन उपक्रमांतर्गत आज दौंड मधील राज्य राखीव पोलीस दल (SRPF) गट 5 येथे पावसाचे पाणी संकलन आणि सांडपाणी पुनर्वापर प्रकल्प सुरू केला. हिंदुजा फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. पॉल अब्राहम आणि SRPF चे पोलीस महानिरीक्षक श्री. अशोक मोराळे यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन झाले. हा प्रकल्प या भागातील शाश्वत जलव्यवस्थापनासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.

‘महाराष्ट्राचे धान्यभांडार’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दौंड मध्ये हिरवीगार शेती आणि भीमा-पवना नद्यांच्या सान्निध्यात असूनही उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई जाणवते. अत्यधिक उष्णता, भूगर्भजल पातळीतील घट, झपाट्याने वाढणारे शहरीकरण आणि पाणीसाठ्याच्या अपुऱ्या सुविधा यामुळे अनेक भाग दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले आहेत.

दौंडमधील वाढती पाणीटंचाई सोडवण्यासाठी फाउंडेशनने सांडपाणी पुनर्वापर प्रकल्पाच्या जोडीला SRPF गट 5 मध्ये 9 तलाव आणि सांडपाणी पुनर्वापर प्रकल्पाची अंमलबजावणी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. या उपक्रमाने SRPF गट 5 येथे पूर्वीपासूनच कार्यान्वित असलेल्या मोठ्या प्रमाणावरील पावसाळी पाणी संकलन प्रकल्पाला आणखी बळकट केले आहे. हा उपक्रम सेंटर फॉर एन्व्हायर्नमेंटल रिसर्च अँड एज्युकेशन (CERE) या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने राबवण्यात आला आहे.

हिंदुजा फाउंडेशनचे अध्यक्ष पॉल अब्राहम यांनी या उपक्रमाचा प्रभाव ठळकपणे मांडत सांगितले, “दौंडसारख्या ठिकाणी पाणीटंचाई हा मोठा प्रश्न असून त्यामुळे दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होत आहे. SRPF येथील हिंदुजा फाउंडेशनच्या पावसाचे पाणी संकलन आणि सांडपाणी पुनर्वापर प्रकल्पामुळे आम्ही जलसंवर्धन आणि हवामान बदल प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये योगदान देत आहोत. लाखो लिटर पावसाचे पाणी संकलित करून आणि जलस्रोतांचे प्रदूषण रोखून आम्ही हवामान अनुकूल जलव्यवस्थापन आणि शाश्वत शहरी हरित उपक्रमासाठी एक आदर्श मापदंड  निर्माण करत आहोत.”

जल जीवन उपक्रमांतर्गत SRPF गट 5 येथे 6 नवीन तलाव निर्माण करण्यात आले असून, 3 जुने तलाव खोल करण्यात आले आहेत. यामुळे स्थानिक पाणीसाठ्यात मोठी सुधारणा झाली आहे. तसेच, 11 पुनर्भरण विहिरी आणि ओव्हरफ्लो चर उभारण्यात आले असून त्यामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत होईल आणि पावसाचे पाणी वाहून जाण्यापासून रोखले जाईल.

या कार्यक्रमाने SRPF गट 5 येथे 500 स्थानिक प्रजातींच्या झाडांची लागवड करत आणि  94% टिकून राहण्याचा दर साध्य करत आपला प्रभाव आणखी विस्तारला आहे. हा उपक्रम पुढील 15 वर्षांत अंदाजे 119.13 मेट्रिक टन CO₂ शोषून घेण्यास मदत करेल. त्यामुळे हवामान बदल रोखण्यात मदत होईल. 34 देशी प्रजातींचा समावेश करून, पर्यावरणाचा समतोल राखण्यात आणि स्थानिक जैवविविधतेस पाठबळ देत दीर्घकालीन शाश्वतता सुनिश्चित करण्यात यश मिळाले आहे.

SRPF 5 मधील जलसंवर्धन आणि पर्यावरण पुनरुज्जीवनाच्या प्रयत्नांच्या सर्वांगीण दृष्टीकोनामुळे दरवर्षी 124.85 दशलक्ष लिटर गोडे पाणी वाचले आहे. याचा थेट लाभ 4,000 रहिवासी आणि 1,000 कर्मचाऱ्यांना मिळत असून, 40 एकर शेती आणि 20 एकर जंगलाचे संवर्धनही होत आहे.

अलिकडेच हिंदुजा फाउंडेशनने त्यांच्या प्रमुख जल जीवन उपक्रमांतर्गत 18 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील 4,000 हून अधिक गावांमध्ये 5 दशलक्ष (50 लाख) लोकांवर सकारात्मक प्रभाव पाडण्यात यश मिळाल्याचे जाहीर केले.

हिंदुजा फाउंडेशनने आपल्या समूह कंपन्यांसोबत मिळून देशभरातील विविध जलस्रोत पुनर्संचयित केले आहेत. त्यामध्ये देशभरातली 100 तलावांचा समावेश आहे. यामध्ये ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाची बावडी अहमदाबादमधील मकरबा टॅंक, जोधपूरमधील नवलखा बावडी, अलवार (राजस्थान) येथील राणी मूसी सागर आणि नवी दिल्लीतील हौज शामशी या प्रकल्पांचा समावेश आहे.

  • Related Posts

    मनसे सरचिटणीसांचं मुख्यमंत्र्याना पत्र..!

    गुढीपाडवाच्या भाषणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगजेबाच्या कबरीवर फलक लावण्याचा उल्लेख केला यावर तातडीने मनसे सरचिटणीस नयन प्रदीप कदम यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. त्या…

    पूर्वमोसमी पावसाची हूल, मुंबईच्या हवामानात अचानक बदल..!

    मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या विविध भागांमध्ये पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांमध्ये आजही पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. सध्या राज्यात पूर्वमोसमी…

    Leave a Reply

    You Missed

    कराडमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाचा कहर ; मलकापूर आणि कराडमध्ये मोठे नुकसान !

    कराडमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाचा कहर ; मलकापूर आणि कराडमध्ये मोठे नुकसान !

    ९०० हून अधिक औषधांच्या किंमती वाढल्या, नागरिकांवरील आर्थिक भार वाढणार !

    ९०० हून अधिक औषधांच्या किंमती वाढल्या, नागरिकांवरील आर्थिक भार वाढणार !

    “लोकशाही पद्धतीने कलाकाराची हत्या कशी करायची?”; कुणाल कामराची नवी पोस्ट चर्चेत !

    “लोकशाही पद्धतीने कलाकाराची हत्या कशी करायची?”; कुणाल कामराची नवी पोस्ट चर्चेत !

    सर्वोच्च न्यायालयाने रणवीर अलाहाबादियाचा पासपोर्ट अर्ज फेटाळला; दोन आठवड्यांनी पुढील सुनावणी…

    सर्वोच्च न्यायालयाने रणवीर अलाहाबादियाचा पासपोर्ट अर्ज फेटाळला; दोन आठवड्यांनी पुढील सुनावणी…

    मनसे सरचिटणीसांचं मुख्यमंत्र्याना पत्र..!

    मनसे सरचिटणीसांचं मुख्यमंत्र्याना पत्र..!

    पर्यटकांचा जोरदार उत्साह ; निसर्ग उन्नत मार्गाचे सर्व स्लॉट हाऊसफुल्ल..!

    पर्यटकांचा जोरदार उत्साह ; निसर्ग उन्नत मार्गाचे सर्व स्लॉट हाऊसफुल्ल..!

    पूर्वमोसमी पावसाची हूल, मुंबईच्या हवामानात अचानक बदल..!

    पूर्वमोसमी पावसाची हूल, मुंबईच्या हवामानात अचानक बदल..!

    संतोष देशमुख प्रकरणात नवे ट्विस्ट – महिला कटाचा आरोप, तिची हत्या

    संतोष देशमुख प्रकरणात नवे ट्विस्ट – महिला कटाचा आरोप, तिची हत्या

    “वाल्मिक कराड मारहाण प्रकरणात नवा ट्विस्ट – सुरेश धस यांचा दावा चर्चेत”

    “वाल्मिक कराड मारहाण प्रकरणात नवा ट्विस्ट – सुरेश धस यांचा दावा चर्चेत”