शिरूरमध्ये जीवघेणा अपघात; कंटेनरच्या धडकेत वडील-मुलीसह तिघांचा बळी

शिरूर तालुक्यातील न्हावरा – तळेगाव रस्त्यावर रविवारी (२३ मार्च) रात्री झालेल्या भीषण अपघातात वडील आणि मुलीसह तिघांचा मृत्यू झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. मोटार आणि कंटेनरच्या धडकेत ही दुर्घटना घडली.

या अपघातात कैलास कृष्णाजी गायकवाड (४९), त्यांची मुलगी गौरी कैलास गायकवाड (२०, दोघेही रा. निंबाळकर वस्ती, न्हावरा, ता. शिरूर, जि. पुणे) आणि गणेश महादेव नेर्लेकर (२५, रा. कोकणगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) यांचा मृत्यू झाला. तसेच दुर्गा कैलास गायकवाड (४८) या गंभीर जखमी झाल्या आहेत.

अपघाताचा घटनाक्रम असा आहे की, रविवारी रात्री कैलास गायकवाड आपल्या पत्नी, मुलगी आणि मेव्हण्यासोबत वाघोलीहून न्हावरेकडे जात होते. तळेगाव ते न्हावरे मार्गावर संदीप सरके यांच्या घराजवळ त्यांच्या मोटारीला समोरून येणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात कैलास गायकवाड, गौरी गायकवाड आणि गणेश नेर्लेकर यांचा जागीच मृत्यू झाला, तर दुर्गा गायकवाड गंभीर जखमी झाल्या.

अपघातानंतर कंटेनर चालक फरार झाला आहे. या प्रकरणी रवींद्र महादेव सोनवणे (३८, रा. कुटेवस्ती, न्हावरे) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भोते या प्रकरणाचा तपास करत आहेत.

  • Related Posts

    ‘लाडकी बहीण’ योजनेतील २१०० रुपये मिळण्यासाठी महिलांना पाच वर्षे प्रतीक्षा करावी लागणार – डॉ. नीलम गोऱ्हे

    पुणे : राज्य सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत महिलांमध्ये प्रचंड अपेक्षा आहेत. मात्र, या योजनेतील २१०० रुपये दरमहा देण्यासंदर्भात अद्याप कोणताही स्पष्ट निर्णय झालेला नाही. यासंदर्भात विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम…

    शिरूरजवळ भीषण अपघात; वडील-मुलीसह तिघांचा मृत्यू, एक महिला गंभीर जखमी

    शिरूर तालुक्यातील न्हावरा – तळेगाव रस्त्यावर रविवारी (२३ मार्च) रात्री झालेल्या भीषण अपघातात वडील आणि मुलीसह तिघांचा मृत्यू झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. मोटार आणि कंटेनरच्या धडकेत…

    Leave a Reply

    You Missed

    कराडमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाचा कहर ; मलकापूर आणि कराडमध्ये मोठे नुकसान !

    कराडमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाचा कहर ; मलकापूर आणि कराडमध्ये मोठे नुकसान !

    ९०० हून अधिक औषधांच्या किंमती वाढल्या, नागरिकांवरील आर्थिक भार वाढणार !

    ९०० हून अधिक औषधांच्या किंमती वाढल्या, नागरिकांवरील आर्थिक भार वाढणार !

    “लोकशाही पद्धतीने कलाकाराची हत्या कशी करायची?”; कुणाल कामराची नवी पोस्ट चर्चेत !

    “लोकशाही पद्धतीने कलाकाराची हत्या कशी करायची?”; कुणाल कामराची नवी पोस्ट चर्चेत !

    सर्वोच्च न्यायालयाने रणवीर अलाहाबादियाचा पासपोर्ट अर्ज फेटाळला; दोन आठवड्यांनी पुढील सुनावणी…

    सर्वोच्च न्यायालयाने रणवीर अलाहाबादियाचा पासपोर्ट अर्ज फेटाळला; दोन आठवड्यांनी पुढील सुनावणी…

    मनसे सरचिटणीसांचं मुख्यमंत्र्याना पत्र..!

    मनसे सरचिटणीसांचं मुख्यमंत्र्याना पत्र..!

    पर्यटकांचा जोरदार उत्साह ; निसर्ग उन्नत मार्गाचे सर्व स्लॉट हाऊसफुल्ल..!

    पर्यटकांचा जोरदार उत्साह ; निसर्ग उन्नत मार्गाचे सर्व स्लॉट हाऊसफुल्ल..!

    पूर्वमोसमी पावसाची हूल, मुंबईच्या हवामानात अचानक बदल..!

    पूर्वमोसमी पावसाची हूल, मुंबईच्या हवामानात अचानक बदल..!

    संतोष देशमुख प्रकरणात नवे ट्विस्ट – महिला कटाचा आरोप, तिची हत्या

    संतोष देशमुख प्रकरणात नवे ट्विस्ट – महिला कटाचा आरोप, तिची हत्या

    “वाल्मिक कराड मारहाण प्रकरणात नवा ट्विस्ट – सुरेश धस यांचा दावा चर्चेत”

    “वाल्मिक कराड मारहाण प्रकरणात नवा ट्विस्ट – सुरेश धस यांचा दावा चर्चेत”