
मुंबईच्या काही भागातील भाषा वेगळी असू शकते, असा दावा करणार्या जमातीला चपराक देणारा एक भव्य दिव्य शिव जयंती सोहळा आज आंबोली नाक्यातील हेलेन गार्डनमध्ये पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन शाखा क्रमांक ६५ तर्फे करण्यात आले होते. “मी मराठी – अभिमान महाराष्ट्राचा” या नावाने एक नयनरम्य सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला, जो आंबोली सारख्या मराठी भाषिक बहुल विभागात घेण्यात आला.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या रुपात आमदार हारून खान, विधानसभा संघटक संजय कदम, सुनिल खबियां, अनिता बागवे, वीणा टॉक, ज्योत्सना दिघे, संजीवनी घोसाळकर, प्रज्ञा सावंत, लीना त्रिवेदी, स्वाती तावडे, नूतन आयरे, मनाली पाटील, उदय महाले, एकनाथ केळकर, सुधाकर अहिरे, कृष्णा तळवडे, नितीन सोनवणे आणि राजेश खाडे यांसारख्या मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन मनोज जाधव यांनी केले, तर आयोजन श्री प्रसाद आयरे आणि दयानंद कड्डी यांनी केले.
तसेच कार्यक्रमाचे उद्घाटन उपनेते अमोल भैय्या कीर्तिकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
आंबोली नाक्यामध्ये पार पडलेल्या या भव्य सोहळ्यामुळे मराठी भाषेचा अभिमान पुन्हा एकदा जागृत झाला आहे. नागरिकांमध्ये मराठी भाषेची गोडी आणि अभिमान जागरूक करण्यात आला.