
नवी दिल्ली – ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने महत्त्वाचा निर्णय घेत डिसिप्लिनरी ऍक्शन कमिटीच्या (शिस्तभंग समिती) अध्यक्षपदी फरहान आझमी यांची नियुक्ती जाहीर केली आहे. पक्ष संघटनेत शिस्त व नियोजनबद्धता राखण्यासाठी ही समिती महत्त्वाची भूमिका बजावते.
फरहान आझमी यांचे काँग्रेस पक्षाशी जुने नाते आहे. त्यांनी अल्पसंख्याक काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. तसेच, *फरहान आझमी फाउंडेशन*च्या माध्यमातून समाजसेवेचे भरीव कार्य केले आहे. गरजूंसाठी मदतीचे हात पुढे करण्यापासून ते पक्षाच्या धोरणांना जनतेपर्यंत पोहोचवण्यापर्यंत त्यांनी मोठे योगदान दिले आहे.
त्यांच्या या नेत्यत्त्वगुणांची आणि सातत्यपूर्ण कार्यपद्धतीची दखल घेत त्यांची नव्या जबाबदारीसाठी निवड करण्यात आली आहे. पक्षश्रेष्ठींच्या या निर्णयाने कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा संचारली असून, सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे