भारतीय वंशाच्या बालेश धनखडला ऑस्ट्रेलियात ४० वर्षांची शिक्षा – बलात्कारासह ३९ गुन्ह्यांत दोषी..!

ऑस्ट्रेलियातील भारतीय समुदायाचा माजी नेता आणि एकेकाळचा ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ भाजपाचा (OFBJP) सक्रिय सदस्य बालेश धनखड याला १३ बलात्कार आणि एकूण ३९ गुन्ह्यांत दोषी ठरवल्यानंतर ४० वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या इतिहासातील सर्वांत धोकादायक बलात्कारींपैकी एक अशी अधिकाऱ्यांनी त्याची ओळख दिली आहे.

नोकरीच्या आमिषाने फसवणूक आणि अमली पदार्थांचा वापर

धनखडने नोकरीच्या बनावट मुलाखतींच्या नावाखाली तरुण महिलांना फसवून त्यांना अमली पदार्थ देऊन बलात्कार केला. महिलांच्या संमतीशिवाय हे अत्याचार रेकॉर्ड करून तो त्यांचा गैरवापर करायचा. त्याने कोरियन महिलांना खास लक्ष्य केलं, त्यांच्यावर अमानुष अत्याचार केले आणि त्यांना सौंदर्य, बुद्धीमत्ता यांच्या आधारे रँकिंग दिली जात असे.

२०१८ मध्ये पाचव्या पीडितेवर अत्याचार केल्यानंतर पोलिसांनी त्याच्या सिडनी सीबीडी अपार्टमेंटवर छापा टाकला. या वेळी मोठ्या प्रमाणावर डेट-रेप ड्रग्ज आणि गुप्त कॅमेऱ्यात रेकॉर्ड केलेले अत्याचाराचे व्हिडिओ सापडले.

न्यायालयाचा कठोर निर्णय

२०२३ मध्ये सिडनी न्यायालयाने त्याला दोषी ठरवल्यानंतर, आता जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश मायकल किंग यांनी त्याच्या गुन्ह्यांना अत्यंत घृणास्पद आणि पूर्वनियोजित ठरवत ४० वर्षांची शिक्षा सुनावली. त्याने केवळ स्वतःच्या विकृत इच्छांसाठी पीडितांचे जीवन उद्ध्वस्त केले, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

भाजपाचा निषेध आणि संबंधांचा इन्कार

बालेश धनखडच्या गुन्हेगारी कारवायांविषयी २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियातील ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ भाजपाने (OFBJP) सोशल मीडियावरून त्याचा निषेध केला. तसेच, त्याने २०१८ मध्येच संघटनेतील आपले पद सोडल्याचे स्पष्ट केले.

या खटल्यामुळे ऑस्ट्रेलियातील भारतीय समुदायात मोठी खळबळ उडाली असून, कठोर शिक्षेचा निर्णय हा पीडितांसाठी न्याय देणारा ठरल्याचे मानले जात आहे.

  • Related Posts

    ऑपरेशन सिंदूर: भारताचा निर्णायक प्रहार, पाकिस्तान हादरला; पाक नागरिकाची थेट कबुली – “खरंच घुसून मारलं!”

    भारताने पुन्हा एकदा जगाला दाखवून दिलं की, देशाच्या सुरक्षेवर कोणतीही तडजोड मान्य नाही. 7 मेच्या मध्यरात्री भारताच्या लष्कराने पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर जबरदस्त हवाई हल्ले करत ‘ऑपरेशन सिंदूर’…

    ऑपरेशन सिंदूरनंतर मोदींचं पहिलं जाहीर वक्तव्य – “2040 पर्यंत चंद्रावर भारतीय पाऊल असेल”

    जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या अमानवीय दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने काल मध्यरात्री मोठी कारवाई करत पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केली. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत करण्यात आलेल्या या कारवाईत ९ दहशतवादी…

    Leave a Reply

    You Missed

    ऑपरेशन सिंदूर: भारताचा निर्णायक प्रहार, पाकिस्तान हादरला; पाक नागरिकाची थेट कबुली – “खरंच घुसून मारलं!”

    ऑपरेशन सिंदूर: भारताचा निर्णायक प्रहार, पाकिस्तान हादरला; पाक नागरिकाची थेट कबुली – “खरंच घुसून मारलं!”

    ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान आक्रमक; भारतातील १५ जिल्ह्यांवर हायअलर्ट

    ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान आक्रमक; भारतातील १५ जिल्ह्यांवर हायअलर्ट

    मुंबई-ठाण्यात अचानक रेन स्ट्राईक; चाकरमान्यांची तारांबळ, लोकल सेवा विस्कळीत !

    मुंबई-ठाण्यात अचानक रेन स्ट्राईक; चाकरमान्यांची तारांबळ, लोकल सेवा विस्कळीत !

    दहशतवाद्यांना कठोर शिक्षा हवी, पण युद्ध हा उपाय नाही – राज ठाकरे यांची एअर स्ट्राइकवर प्रतिक्रिया

    दहशतवाद्यांना कठोर शिक्षा हवी, पण युद्ध हा उपाय नाही – राज ठाकरे यांची एअर स्ट्राइकवर प्रतिक्रिया

    ऑपरेशन सिंदूरनंतर मोदींचं पहिलं जाहीर वक्तव्य – “2040 पर्यंत चंद्रावर भारतीय पाऊल असेल”

    ऑपरेशन सिंदूरनंतर मोदींचं पहिलं जाहीर वक्तव्य – “2040 पर्यंत चंद्रावर भारतीय पाऊल असेल”

    ऑपरेशन सिंदूर: भारताची पाकमध्ये धडक कारवाई; पाकिस्तानात भीतीचे वातावरण, शाळा-विमानतळ बंद

    ऑपरेशन सिंदूर: भारताची पाकमध्ये धडक कारवाई; पाकिस्तानात भीतीचे वातावरण, शाळा-विमानतळ बंद

    ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या ९ तळांवर भारताची अचूक एअर स्ट्राईक…

    ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या ९ तळांवर भारताची अचूक एअर स्ट्राईक…

    भारत-पाकिस्तान संघर्ष शिगेला! मॉक ड्रिलनंतर थेट युद्ध..?

    भारत-पाकिस्तान संघर्ष शिगेला! मॉक ड्रिलनंतर थेट युद्ध..?

    महाराष्ट्रात ७ मे रोजी मॉक ड्रील; युद्धजन्य परिस्थितीची रंगीत तालीम..!

    महाराष्ट्रात ७ मे रोजी मॉक ड्रील; युद्धजन्य परिस्थितीची रंगीत तालीम..!