महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (MSRDC) उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, श्री. अनिलकुमार बळीराम गायकवाड यांना अमेरिकेच्या ६०व्या राष्ट्रपती शपथविधी सोहळ्यासाठी विशेष निमंत्रण मिळाले. या ऐतिहासिक सोहळ्यात त्यांनी महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांतील प्रगतीचे यश आणि भविष्यातील योजनांवर जागतिक नेत्यांसमोर भर दिला.
श्री. गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली MSRDC ने विविध प्रकल्पांद्वारे महाराष्ट्राला पायाभूत सुविधा क्षेत्रात नवीन उंचीवर नेले आहे. समृद्धी महामार्ग, वांद्रे-वरळी सी लिंक, मंत्रालय पुनर्बांधणी आणि भारतातील सर्वात लांब रस्त्यावरील बोगदा यांसारखे महत्त्वाचे प्रकल्प त्यांच्या यशस्वी कार्याचा भाग आहेत. या प्रकल्पांनी राज्याच्या दळणवळण व्यवस्थेला नवीन स्वरूप दिले असून आर्थिक प्रगतीसाठी मार्ग सुकर केला आहे.
अमेरिकेतील राष्ट्रपती शपथविधी सोहळ्यात श्री. गायकवाड यांनी एलॉन मस्क (टेस्ला), सुंदर पिचाई (गूगल), मसायोशी सोन (सॉफ्टबँक) यांच्यासह विविध आंतरराष्ट्रीय नेत्यांशी संवाद साधला. त्यांनी महाराष्ट्राच्या पायाभूत प्रकल्पांतील गुंतवणुकीच्या संधींवर प्रकाश टाकला आणि राज्याच्या प्रगत धोरणांची माहिती दिली. यावेळी त्यांनी शाश्वत शहरी विकास, अद्ययावत वाहतूक व्यवस्थापन, तसेच स्मार्ट सिटी प्रकल्पांसाठी असलेल्या संधींबाबत चर्चा केली.
“जागतिक व्यासपीठावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणे हा मोठा सन्मान आहे. जागतिक नेत्यांसोबत झालेल्या संवादातून मिळालेला अनुभव महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा प्रकल्पांना नवीन दृष्टीकोन प्रदान करेल. आमचे ध्येय महाराष्ट्राला शाश्वत आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करणारे राज्य बनविणे आहे,” असे श्री. गायकवाड यांनी सांगितले.
महाराष्ट्राच्या प्रगतीला चालना
या निमित्ताने महाराष्ट्राच्या धोरणांना जागतिक स्तरावर अधोरेखित करण्याची संधी मिळाली आहे. राज्याच्या पायाभूत प्रकल्पांतील गुंतवणुकीच्या संधी आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यामुळे महाराष्ट्राला जागतिक स्तरावर महत्त्वाचे स्थान मिळाले आहे.
मालाड:मढ”तिसाई” नौकाधारक मच्छिमारास ANHUI XINZHOU SHIPPING कडून आर्थिक नुकसान भरपाई मंजूर
मालाड:मढ कोळीवाड्यातील हेमदीप हरिश्चंद्र टिपरी यांच्या IND-MH-2-MM-5251 तिसाई या मासेमारी नौकेला २८ डिसेंबर २०२४ रोजी मध्यरात्री समुद्रात ZAU CHENG XIN ZHOO या मालवाहू जहाजाने धडक दिली. कोळीवाड्यातील *स्वप्निल कोळी* यांनी…