भारतीय आहारामध्ये दूध हा अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या आहारात दुधाचे स्थान अबाधित आहे. शारीरिक विकासासाठी, पोषणमूल्यांकरिता आणि आरोग्य सुधारण्यासाठी दूध आवश्यक मानले जाते. परंतु दुर्दैवाने, आज भारतात दूध उत्पादन आणि विक्रीतील भेसळीमुळे हा “पूर्ण अन्न” मानला जाणारा घटक आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे.
भारतात दूध उत्पादनात जागतिक स्तरावर अग्रेसर असतानाही विक्रीच्या आकडेवारीत मोठी विसंगती दिसून येते. देशात दिवसाला 22 कोटी लिटर दूध उत्पादन होते, मात्र विक्रीचे प्रमाण 56 कोटी लिटर असल्याचे दिसते. ही तफावत भेसळीची प्रचंड मोठी समस्या अधोरेखित करते. पाणी मिसळणे, कृत्रिम फॅट, युरिया, स्टार्च, डिटर्जंट यांसारखी रसायने वापरून दूध विकले जाते. दूध टिकवण्यासाठी फॉर्मालिनसारखे रसायनही वापरले जाते, जे आरोग्यासाठी घातक ठरते.
या भेसळीचे परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर थेट आणि गंभीर होत आहेत. लहान मुलांमध्ये पोषणमूल्य कमी झाल्याने शारीरिक आणि बौद्धिक विकास थांबतो. अपचन, उलट्या, मूत्रपिंड विकार, त्वचासंबंधी आजार आणि कर्करोगासारखे प्राणघातक आजार या भेसळयुक्त दुधामुळे होऊ शकतात. विशेषतः अशा रसायनांचा दीर्घकाळ वापर शरीरातील प्रमुख अवयवांवर गंभीर परिणाम करतो.
भेसळ रोखण्यासाठी सरकारी पातळीवर काही प्रयत्न होत असले तरी समस्या अधिक व्यापक आहे. दुधाचे उत्पादन, प्रक्रिया, आणि वितरण यामध्ये पारदर्शकता येणे गरजेचे आहे. ग्राहकांनी देखील सतर्क राहून भेसळयुक्त दूध ओळखण्यासाठी साध्या चाचण्या कराव्यात. स्थानिक उत्पादक संस्थांना प्रोत्साहन दिल्यास भेसळीला आळा घालता येईल.
दुधाला “पवित्र अन्न” मानणाऱ्या देशात या प्रकारच्या भेसळीमुळे लोकांच्या विश्वासाला तडा जात आहे. ही समस्या आरोग्याचा प्रश्न बनला आहे, जो आता तातडीने सोडवला गेला पाहिजे. दुधाची शुद्धता ही फक्त गुणवत्ता नाही, तर ती आरोग्याची हमी आहे. सरकार, उत्पादक, वितरक, आणि ग्राहक यांनी एकत्र येऊन भेसळीच्या संकटाला रोख लावल्याशिवाय निरोगी समाज घडवणे शक्य होणार नाही.
पाहा जागृत, रहा जागृत
जागृत महाराष्ट्र न्यूज संपादक अमोल भालेराव
चौथ्या स्तंभाच्या ढासळत्या प्रतिष्ठेचा प्रश्न पत्रकार झाला कामगार: चौथ्या स्तंभाच्या ढासळत्या प्रतिष्ठेचा प्रश्न
पत्रकारिता म्हणजे सत्याचा शोध घेऊन जनतेपर्यंत पोहोचवण्याची कला, एक जबाबदारी, आणि लोकशाहीचा आधारस्तंभ. मात्र, आजच्या काळात पत्रकारितेचे मूळ उद्दिष्ट हरवत चालले आहे. जेथे पत्रकार समाजाचा प्रहरी आणि जनतेचा आवाज असायला…