मालाड:विधानसभेतील वॉर्ड ४९ मधील धारवली गावातील नागरिकांसाठी 19 जानेवारी 2022 हा दिवस इतिहासात कोरला गेला आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 76 वर्षे झाली तरी गाव अंधारात होते. मात्र, माजी नगरसेविका संगीता सुतार ,स्थानिक समाजसेवक संजय सुतार यांच्या प्रयत्नांमुळे गावातील मुख्य रस्त्यावर वीज पुरवठा सुरू होऊन गाव उजळले.
संजय सुतार यांच्या या ऐतिहासिक कार्यामुळे गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. जसे अंध व्यक्तींना अचानक दिसायला लागल्यावर होणारा आनंद गावकऱ्यांनी अनुभवला.
विशेष म्हणजे, ही विकासाची मोहीम उभारणाऱ्या माजी नगरसेविका संगीता संजय सुतार यांनी नगरसेवक पदाचा कार्यकाळ संपल्यानंतरही विकासकामे सुरूच ठेवली. त्यांचा हा जनसेवेचा वसा आजही अखंड सुरू आहे.
धारवली गावातील वीज पुरवठ्याच्या या ऐतिहासिक कार्याची चर्चा वॉर्ड क्रमांक 49 मध्ये सतत होताना दिसते. गावातील नागरिक आता महायुती सरकारकडून लवकरच महापालिका निवडणुकांच्या अपेक्षेत आहेत, जेणेकरून अशा कार्यक्षम लोकप्रतिनिधींना अधिकृत जबाबदारी मिळून अधिक विकासकामे करता येतील.
– जागृत महाराष्ट्र न्यूज
संपादक: अमोल भालेराव, मालाड, मुंबई