कुंपण शेत खाते की शेताने कुंपण खाल्ले? – मुंबईतील बोरिवली वनक्षेत्रातील अतिक्रमणाचा गंभीर प्रकार

भाग एक

मुंबईसारख्या शहरात निसर्गाची शेवटची निशाणी असलेल्या कांदळवन आणि वनक्षेत्रांवर अनधिकृत बांधकामांच्या सावटाने संकट गडद झाले आहे. मढ येथील मास्टर वाडी कृष्णाचा पाढा आदिवासी पाड्यातील वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमणाचा प्रचंड वाढलेला प्रकार म्हणजे सरकारी व्यवस्थेचा बेशिस्त कारभार व भ्रष्टाचाराची पराकाष्ठा दाखवतो. 

मढ येथील मास्टर वाडी कृष्णाचापाढा आदिवासी पाड्यात झालेल्या अतिक्रमणाविरुद्ध स्थानिक रहिवाशांनी पाच महिन्यांपूर्वी तक्रार दाखल केली होती. सुरुवातीला वनविभाग आणि नगर भूमापन विभागाचे अधिकारी एकत्रित पाहणीसाठी आले. मात्र, त्यानंतर परिस्थिती तशीच राहिली. आजवर कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. कधी तहसीलदार गैरहजर, कधी पोलिसांची अनुपस्थिती, तर कधी नगर भूमापन अधिकाऱ्यांची टाळाटाळ – हे सर्व पाहता ही प्रक्रिया मुद्दाम लांबवली जात असल्याचे स्पष्ट होते. 

अधिकारी आणि भू-माफियांचा साटेलोटे?

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, अधिकारी तक्रारींच्या वेळी दाखवलेला उत्साह नंतर गायब होतो. तक्रार उघड होताच भू-माफियांकडे अधिकारी पळतात आणि त्यांच्याशी संगनमत करून फक्त कागदोपत्री प्रक्रिया चालवतात. यामध्ये खालपासून वरपर्यंतच्या अधिकाऱ्यांचा थेट सहभाग असल्याचे बोलले जाते. 

कांदळवन ही मुंबईसाठी जिवंत रक्षक भिंत आहे, जी पूर आणि हवामान बदलाचा धोका कमी करते. अतिक्रमणामुळे झाडे तोडली जातात, जैवविविधतेचा ऱ्हास होतो आणि परिसरातील स्थानिक लोकांचे जीवनमान बिघडते. यातून आदिवासींचे हक्कही हिरावले जातात. 

जागतिक पर्यावरणीय आपत्तीचा धोका
मुंबईतील कांदळवन हे जागतिक पर्यावरणीय वारसा असलेले स्थान आहे. जागतिक हवामान परिषदांनीदेखील अशा परिसंस्थांचे जतन करण्याचे आवाहन केले आहे. पण स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कारभारामुळे हे नैसर्गिक ठेवे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. 

संबंधित विभागांतील अधिकाऱ्यांची सखोल चौकशी आणि दोषींवर कारवाई होणे गरजेचे आहे. 
जर त्वरित उपाययोजना करण्यात आल्या नाहीत, तर येत्या काही वर्षांत मुंबईतील निसर्ग आपली ओळख कायमची गमावेल. आता स्थानिक नागरिकांनी जागे होऊन निसर्ग वाचवण्यासाठी लढा दिला पाहिजे. कारण, “कुंपण शेत खाते की शेताने कुंपण खाल्ले?” हा प्रश्न आता अधिक गंभीर बनला आहे.
पुढील भागात आपण पाहू कशा पद्धतीने जागेवर अतिक्रमण करून जागा विकली जाते..

पाहा जागृत ,रहा जागृत
जागृत महाराष्ट्र न्यूज संपादक अमोल भालेराव मालाड,मुंबई

  • Related Posts

    महाराष्ट्र विधानसभेत पावसाळी अधिवेशनाची धग; हिंदी लादणीचा मागे वळलेला निर्णय, विकास निधी, आणि विरोधकांचे घणाघाती हल्ले!

    राज्य सरकारने पायाभूत सुविधांमध्ये गती आणण्यासाठी ₹57,509 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. यात विशेषतः मेट्रो प्रकल्पांसाठी सर्वाधिक तरतूद करण्यात आली असून, नागरी वाहतूक व्यवस्था सुधारण्यावर सरकारचे लक्ष असल्याचे दिसते. मुख्यमंत्री…

    मुंब्रा-शीळमधील बांधकामांचा प्रश्न: ‘दोषी व्यावसायिकांची शिक्षा निष्पाप नागरिकांना नको’–खासदार गोपाल शेट्टी यांची भूमिका

    अलीकडच्या काळात ठाणे आणि राज्यातील इतर भागांमध्ये बेकायदेशीर बांधकामांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून, या संदर्भातील वृत्तपत्रीय व न्यायालयीन चर्चांना वेग मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार मा. गोपाल शेट्टी…

    Leave a Reply

    You Missed

    मुंबईतील शिक्षिकेने अल्पवयीन विद्यार्थ्यावर अत्याचार केल्याप्रकरणात धक्कादायक खुलासे; तपासात पुढील माहिती समोर

    मुंबईतील शिक्षिकेने अल्पवयीन विद्यार्थ्यावर अत्याचार केल्याप्रकरणात धक्कादायक खुलासे; तपासात पुढील माहिती समोर

    मनसेच्या विजयी मेळाव्याआधीच नवा वाद! सुशील केडिया यांचं ट्विट आणि मनसैनिकांचा संताप

    मनसेच्या विजयी मेळाव्याआधीच नवा वाद! सुशील केडिया यांचं ट्विट आणि मनसैनिकांचा संताप

    महाराष्ट्र विधानसभेत पावसाळी अधिवेशनाची धग; हिंदी लादणीचा मागे वळलेला निर्णय, विकास निधी, आणि विरोधकांचे घणाघाती हल्ले!

    महाराष्ट्र विधानसभेत पावसाळी अधिवेशनाची धग; हिंदी लादणीचा मागे वळलेला निर्णय, विकास निधी, आणि विरोधकांचे घणाघाती हल्ले!

    मुंब्रा-शीळमधील बांधकामांचा प्रश्न: ‘दोषी व्यावसायिकांची शिक्षा निष्पाप नागरिकांना नको’–खासदार गोपाल शेट्टी यांची भूमिका

    मुंब्रा-शीळमधील बांधकामांचा प्रश्न: ‘दोषी व्यावसायिकांची शिक्षा निष्पाप नागरिकांना नको’–खासदार गोपाल शेट्टी यांची भूमिका

    पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

    पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

    पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

    पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

    जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

    जळगाव जिल्ह्यातील  चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

    वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

    वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

    हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई

    हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई