उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात गीता जयंतीनिमित्त भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. माजी खासदार व जनसेवक गोपाळ शेट्टी यांच्या संकल्पनेतून ११ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५.३० वाजता कांदिवली पश्चिम येथील पोयसर जिमखानामध्ये हा सोहळा संपन्न होणार आहे.
सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांशी कायमच जोडले गेलेल्या गोपाळ शेट्टी यांनी डिसेंबर २०२१ मध्ये लोकसभेत श्रीमद्भगवद्गीतेचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्याची मागणी केली होती. प्रशासनाने निर्णय घेण्याआधीच त्यांनी विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने गीता अभ्यास केंद्रे सुरू केली आणि या अभियानाचा व्यापक प्रचार केला.
गीता जयंतीच्या या सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल माननीय श्री सीपी राधाकृष्णन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच, इस्कॉन जुहूचे अध्यक्ष परमपूज्य श्री ब्रिज हरिदासजी यांच्या उपस्थितीने कार्यक्रम अधिकच भव्य होणार आहे.
सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे प्रख्यात नृत्यांगना पद्मश्री डॉ. सितारा देवी यांची कन्या डॉ. जयंती माला यांची ‘श्रीकृष्ण लीला’ या भक्तिमय नृत्यनाटिकेची सादरीकरण होणार आहे, ज्याची रसिक आतुरतेने वाट पाहत आहेत.
कार्यक्रमाला उत्तर मुंबईतील भाजप नेते, आमदार, नगरसेवक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. पोयसर जिमखाना अध्यक्ष मुकेश भंडारी, करुणाकर शेट्टी आणि गीता अभ्यास समितीचे अध्यक्ष डॉ. योगेश दुबे यांनी सर्व नागरिकांना या पवित्र सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
मालाड: चिकुवाडी स्वप्नातील घर उद्ध्वस्त करणारी लुटारू व्यवस्था
मुंबईतील मालाडच्या चिकूवाडी परिसरात प्रशासनाच्या बेकायदेशीर कारवाईमुळे शेकडो कुटुंबं उद्ध्वस्त झाली आहेत. आपल्या आयुष्याची सगळी पुंजी लावून घरं खरेदी करणाऱ्या सामान्य माणसाला आज या भ्रष्ट व्यवस्थेनं रस्त्यावर आणलं आहे. नागरिकांनी…