गीता जयंतीनिमित्त उत्तर मुंबईत भव्य कार्यक्रमाचे  आयोजन माजी खासदार  गोपाळ शेट्टी यांच्या संकल्पनेतून होणार

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात गीता जयंतीनिमित्त भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. माजी खासदार व जनसेवक गोपाळ शेट्टी यांच्या संकल्पनेतून ११ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५.३० वाजता कांदिवली पश्चिम येथील पोयसर जिमखानामध्ये हा सोहळा संपन्न होणार आहे. 

सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांशी कायमच जोडले गेलेल्या गोपाळ शेट्टी यांनी डिसेंबर २०२१ मध्ये लोकसभेत श्रीमद्भगवद्गीतेचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्याची मागणी केली होती. प्रशासनाने निर्णय घेण्याआधीच त्यांनी विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने गीता अभ्यास केंद्रे सुरू केली आणि या अभियानाचा व्यापक प्रचार केला. 

गीता जयंतीच्या या सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल माननीय श्री सीपी राधाकृष्णन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच, इस्कॉन जुहूचे अध्यक्ष परमपूज्य श्री ब्रिज हरिदासजी यांच्या उपस्थितीने कार्यक्रम अधिकच भव्य होणार आहे. 

सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे प्रख्यात नृत्यांगना पद्मश्री डॉ. सितारा देवी यांची कन्या डॉ. जयंती माला यांची ‘श्रीकृष्ण लीला’ या भक्तिमय नृत्यनाटिकेची सादरीकरण होणार आहे, ज्याची रसिक आतुरतेने वाट पाहत आहेत. 

कार्यक्रमाला उत्तर मुंबईतील भाजप नेते, आमदार, नगरसेवक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. पोयसर जिमखाना अध्यक्ष मुकेश भंडारी, करुणाकर शेट्टी आणि गीता अभ्यास समितीचे अध्यक्ष डॉ. योगेश दुबे यांनी सर्व नागरिकांना या पवित्र सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

  • Related Posts

    मालाड:मढ जेट्टी रस्त्याचे काम कासव गतीने ,प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर नागरिक नाराज

    मालाड:मढ चर्च ते मढ जेट्टी हा मुख्य रस्ता सहा महिन्यांहून अधिक काळ बंद असल्याने स्थानिक रहिवासी, पर्यटक, आणि विद्यार्थ्यांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे. S. Kumar Group – Shri…

    वर्सोवा-दहिसर सागरी किनारा मार्गासाठी (कोस्टल रोड) प्रकल्पाला गती देण्याची तयारी – केंद्रीय मंत्री पियूष गोयल

    मुंबईतील वर्सोवा ते दहिसर सागरी किनारा मार्गाच्या (कोस्टल रोड) महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला गती देण्यासाठी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी शनिवारी एक मोठी घोषणा केली. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या सर्व…

    Leave a Reply

    You Missed

    शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने हृदयाला छिद्र असलेल्या तब्बल ११५ मुलांची 2D इको तपासणी संपन्न

    शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने हृदयाला छिद्र असलेल्या तब्बल ११५ मुलांची 2D इको तपासणी संपन्न

    महाराष्ट्राच्या पायाभूत प्रगतीला जागतिक ओळख: श्री. अनिलकुमार गायकवाड यांचा ऐतिहासिक सहभाग

    महाराष्ट्राच्या पायाभूत प्रगतीला जागतिक ओळख: श्री. अनिलकुमार गायकवाड यांचा ऐतिहासिक सहभाग

    जागृत महाराष्ट्र न्यूज: दिवसातील महत्त्वाच्या घडामोडी

    जागृत महाराष्ट्र न्यूज: दिवसातील महत्त्वाच्या घडामोडी

    लोकशाहीचा गळा घोटणारे गुन्हेगारीकरण

    लोकशाहीचा गळा घोटणारे गुन्हेगारीकरण

    मालाड:मढ जेट्टी रस्त्याचे काम कासव गतीने ,प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर नागरिक नाराज

    मालाड:मढ जेट्टी रस्त्याचे काम कासव गतीने ,प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर नागरिक नाराज

    खराब रस्त्यांमुळे अपघात: लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्याची गरज

    खराब रस्त्यांमुळे अपघात: लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्याची गरज

    “नागपूर, पुणे, मुंबईसाठी स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेसची घोषणा; लातूरच्या सुविधांकडे दुर्लक्ष, संतप्त नागरिकांचा आक्रोश”

    “नागपूर, पुणे, मुंबईसाठी स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेसची घोषणा; लातूरच्या सुविधांकडे दुर्लक्ष, संतप्त नागरिकांचा आक्रोश”

    मालाड:मढ”तिसाई” नौकाधारक मच्छिमारास ANHUI XINZHOU SHIPPING कडून आर्थिक नुकसान भरपाई मंजूर

    मालाड:मढ”तिसाई” नौकाधारक मच्छिमारास ANHUI XINZHOU SHIPPING कडून आर्थिक नुकसान भरपाई मंजूर

    पत्रकाराच्या मुलाला आणि २ नातेवाईकांना घातला लाखोंचा गंडा

    पत्रकाराच्या मुलाला आणि २ नातेवाईकांना घातला लाखोंचा गंडा