राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत येणार असून, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार आहेत. मुंबईत आज झालेल्या भाजपाच्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. केंद्रीय निरीक्षक निर्मला सीतारामण आणि विजय रुपाणी यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेत हा निर्णय घेण्यात आला.
चंद्रकांत पाटील यांनी फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला आणि सर्व भाजप आमदारांनी त्याला एकमताने अनुमोदन दिलं. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला सत्तास्थापनेचा तिढा अखेर सुटला आहे.
भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार लवकरच शपथविधी करणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारकडून राज्याच्या विकासाच्या नव्या दिशा ठरवण्याची अपेक्षा आहे.
मुख्यमंत्रीपदी पुन्हा फडणवीस यांची नेमणूक
भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी आणि आमदारांनी फडणवीस यांच्यावर विश्वास दाखवला असून, त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला राज्यात सशक्त वाटचाल करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
सत्तास्थापनेचा तिढा सुटला
महायुतीतून सरकार स्थापनेची प्रक्रिया रेंगाळली होती. मात्र, आज झालेल्या बैठकीत सर्व राजकीय गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. नव्या सरकारकडून जनतेच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
राजकारणातील या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघालं आहे.