कळमनुरी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार संतोष बांगर यांनी घेतले मुंबईत चैत्यभूमीचे दर्शन

मुंबई (प्रतिनिधी): हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार संतोष बांगर यांनी आज मुंबईत दादर येथील चैत्यभूमीला भेट देऊन बौद्ध पद्धतीने परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले आणि अभिवादन केले. 

नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत संतोष बांगर यांनी कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून तब्बल 31,000 मताधिक्याने विजय मिळवला. आमदार म्हणून विजयानंतर प्रथमच मुंबईला आल्यावर त्यांनी चैत्यभूमीवर जाऊन महाकारूणीक तथागत भगवान बुद्ध आणि बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना वंदन केले. 

आमदार बांगर हे आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते असून, कळमनुरी विधानसभा मतदारसंघात त्यांनी पूज्य भदंत चंद्रमणी महास्थविर यांच्या नावाने भव्य बुद्ध विहार व विपस्सना ध्यान केंद्राची स्थापना केली आहे. या केंद्रासाठी त्यांनी स्वतःची चार एकर जमीन दान केली असून, या उपक्रमामुळे बौद्ध समुदायामध्ये त्यांच्याबद्दल विशेष आदर निर्माण झाला आहे. 

भदंत चंद्रमणी महास्थविर ध्यानसाधना केंद्राला भविष्यात तीर्थक्षेत्र म्हणून विकसित करण्याचा निर्धार आमदार बांगर यांनी व्यक्त केला. त्यांचा हा उपक्रम बौद्ध धम्म प्रसारासाठी महत्त्वाचा टप्पा ठरेल, असा विश्वास बौद्ध समाज व्यक्त करत आहे.

  • Related Posts

    महाराष्ट्र दिवस: का साजरा केला जातो?

    महाराष्ट्र दिवस दरवर्षी 1 मे रोजी साजरा केला जातो. हा दिवस महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. 1 मे 1960 रोजी, भाषिक आधारावर राज्य पुनर्रचना कायद्यांतर्गत, मुंबई प्रांताचे विभाजन…

    मालाड-मढ येथे गुड फ्रायडेला ख्रिश्चन बांधवांसाठी पाणी वाटप, शाहू फुले आंबेडकर संस्थेचा एकतेचा संदेश

    मालाड: मढ येथे ख्रिश्चन धर्मियांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला गुड फ्रायडे हा पवित्र दिवस शुक्रवारी साजरा करण्यात आला. येशू ख्रिस्ताच्या क्रूसावरील बलिदान आणि कॅलव्हरी येथील मृत्यूचे स्मरण करणारा हा दिवस ख्रिश्चन…

    Leave a Reply

    You Missed

    मुंबईतील शिक्षिकेने अल्पवयीन विद्यार्थ्यावर अत्याचार केल्याप्रकरणात धक्कादायक खुलासे; तपासात पुढील माहिती समोर

    मुंबईतील शिक्षिकेने अल्पवयीन विद्यार्थ्यावर अत्याचार केल्याप्रकरणात धक्कादायक खुलासे; तपासात पुढील माहिती समोर

    मनसेच्या विजयी मेळाव्याआधीच नवा वाद! सुशील केडिया यांचं ट्विट आणि मनसैनिकांचा संताप

    मनसेच्या विजयी मेळाव्याआधीच नवा वाद! सुशील केडिया यांचं ट्विट आणि मनसैनिकांचा संताप

    महाराष्ट्र विधानसभेत पावसाळी अधिवेशनाची धग; हिंदी लादणीचा मागे वळलेला निर्णय, विकास निधी, आणि विरोधकांचे घणाघाती हल्ले!

    महाराष्ट्र विधानसभेत पावसाळी अधिवेशनाची धग; हिंदी लादणीचा मागे वळलेला निर्णय, विकास निधी, आणि विरोधकांचे घणाघाती हल्ले!

    मुंब्रा-शीळमधील बांधकामांचा प्रश्न: ‘दोषी व्यावसायिकांची शिक्षा निष्पाप नागरिकांना नको’–खासदार गोपाल शेट्टी यांची भूमिका

    मुंब्रा-शीळमधील बांधकामांचा प्रश्न: ‘दोषी व्यावसायिकांची शिक्षा निष्पाप नागरिकांना नको’–खासदार गोपाल शेट्टी यांची भूमिका

    पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

    पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

    पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

    पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

    जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

    जळगाव जिल्ह्यातील  चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

    वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

    वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

    हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई

    हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई