मढ, २१ नोव्हेंबर:
जागतिक मच्छिमार दिनाचे औचित्य साधून मढ कोळीवाड्यात गुरुवारी सायंकाळी वांजरे गल्ली जेट्टीवर एक भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचा प्रारंभ मढचे लोकप्रिय समाजसेवक संजय सुतार यांच्या हस्ते तिवर (कांदळवण) वृक्षाला श्रीफल अर्पण करून झाला. परंपरेला साजेसा असा प्रारंभ गावातील कोळी महिलांच्या आरती व पूजेनं करण्यात आला.
सागर बॅंड पथकाच्या कोळी गाण्यांच्या सुरेल ठेक्यावर कोळी महिलांनी सादर केलेल्या पारंपरिक नृत्याने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या प्रसंगी सागर बॅंड पथकाचे मास्तर मधूकर नगी आणि मा. विष्णू कोळी यांचा पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात मच्छिमार समाजातील विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यामध्ये महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे सरचिटणीस किरण कोळी,मढ दर्यादीप मच्छिमार सहकारी सोसायटी लि. अध्यक्ष संतोष कोळी,मानद सचिव अक्षय कोळी, तसेच हरबादेवी मच्छिमार सर्वोदय सहकारी सोसायटीचे अध्यक्ष प्रमोद पाटील आणि सचिव दिपक कोळी यांचा समावेश होता. संस्थांचे संचालक सोमनाथ कोळी, मोजेस कोळी, नितिन कोळी यांच्यासह सौ. अनिता कोळी, सौ. दर्शना धजे आणि मोरेश्वर कोळी यांसारख्या कार्यकर्त्यांनीही कार्यक्रमात योगदान दिले.
कार्यक्रमासाठी कोळी समाजातील महिला, पुरुष, युवक आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोळी समाजाच्या परंपरा जपत, त्यांच्या जीवनशैलीचा आणि एकतेचा हा उत्सव ठरला.
कार्यक्रमाच्या निमित्ताने तिवर वृक्षारोपणावर भर देत समुद्र किनाऱ्याच्या संवर्धनाचा संदेश दिला गेला. यामध्ये सहभागी सर्वांनी पर्यावरण रक्षणाची शपथ घेतली.
हा कार्यक्रम मच्छिमार समाजाच्या योगदानाची आठवण करून देणारा आणि परंपरा, एकता, तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा ठरला.
“कॉम्रेड करीम बूटवाला यांच्या देहदानाने विज्ञानवादी विचारांचे उत्कृष्ट उदाहरण”
मुंबई:अंधेरीभारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड करीम बूटवाला यांच्या देहदानाने विज्ञानवादी आणि मानवतावादी विचारांची प्रखरता पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. आज सायंकाळी त्यांचा पार्थिव देह कूपर रुग्णालयातील वैद्यकीय संशोधन केंद्राला…