उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे आणि रुद्रांश श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

ठाणे :- ठाणे शहरातील ज्युपिटर हॉस्पिटल येथे राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री मा. ना. श्री एकनाथजी शिंदे साहेब आणि कल्याण लोकसभेचे लोकप्रिय खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेब आणि चि.रुद्रांश श्रीकांत शिंदे यांच्या संयुक्त वाढदिवसानिमित्ताने शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व ज्युपिटर हॉस्पिटल ठाणे आणि डॉ. श्रीकांत_शिंदे फाऊंडेशन तथा आरोग्यदुत फाउंडेशन यांच्या तर्फे हृदयाला छिद्र असलेल्या लहान मुलांची मोफत 2D इको तपासणी आणि हृदय शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
              वर्षातून २ वेळा या उपक्रमाचे आयोजन केले जात असून गेल्या ८ वर्षांपासून या आरोग्य शिबिराचे सातत्य राखण्यात शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनला यश आले आहे. गेल्या ८ वर्षांत ज्युपिटर हॉस्पिटल, वाडिया हॉस्पिटल आदी रुग्णालयांच्या माध्यमातून आजपर्यंत लहान मुलांच्या ५ हजार शस्त्रक्रिया यशस्वीपणे पडल्या आहेत. श्री एकनाथ जी शिंदे साहेब आणि मा.खा.डॉ.श्रीकांत दादा शिंदे या दोन्ही नेत्यांच्या संयुक्त  वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेले आजचे हे १६ वे आरोग्य शिबीर होते. हृदयाला छिद्र असलेल्या लहान मुलांची मोफत 2D इको तपासणी आणि गरज असलेल्या मुलांवर हृदय शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
             आज झालेल्या या शिबिरात तब्बल ११५ मुलांची 2D इको तपासणी कारण्यात आली असून शस्त्रक्रिया आवश्यक असलेल्या मुलांवर ज्युपिटर हॉस्पिटल येथे निःशुक शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.  बुलढाणा येथून आलेल्या एका बाळाची शस्त्रक्रिया तात्काळ करणे आवश्यक असल्याने उद्याच करण्यात येणार असून बाळाला आजच ऍडमिट करण्यात आले आहे. अशी माहिती डॉक्टर टीमने माध्यमांशी बोलताना दिली.
              संवेदनशील उपमुख्यमंत्री मा. ना. श्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी कार्यक्रमाला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थिती लावली. श्री एकनाथजी शिंदे यांनी सर्व उपस्थितांना शुभेच्छा देत बालके लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी आई जगदंबे चरणी प्रार्थना केली. सोबतच शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन करत असलेल्या कार्याचे कौतुक केले. उपस्थित डॉक्टर्स आणि नर्सिंग स्टाफचे आभार मनात हीच सेवा ईश्वर सेवा असल्याचे सांगितले.
              या कार्यक्रमाला माजी आमदार शहाजी बापू पाटील, डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन अध्यक्ष विलास जोशी, शिवसेना सचिव सुशांत शेलार, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष ठाणे जिल्हा प्रमुख निखिल बुडजडे, युवा सेनेचे बाजीराव चव्हाण, व्याख्याते प्रा. यशवंत गोसावी, संपादक-DG9 वृत्तवाहिनी प्रभाकर सूर्यवंशी, धर्मवीर अध्यात्मिक सेना हभप अक्षय महाराज भोसले व ज्युपिटर हॉस्पिटल डॉक्टर, कर्मचारी वर्ग आणि नागरिक, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कार्याध्यक्ष श्री राम राऊत, श्री माऊली धुळगंडे सर्व समन्वयक, पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.