लातूर:मध्य रेल्वेच्या नागपूर ते पुणे आणि नागपूर ते मुंबई या मार्गांवर स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे सादर करण्यात आला आहे. गुजरात आणि दिल्लीसह इतर राज्यांमध्ये स्लीपर वंदे भारत ट्रेनचे स्वप्न पूर्ण होत असताना, लातूर जिल्ह्यातील स्थिती मात्र खूपच वेगळी आहे.
२०११ च्या जनगणनेनुसार लातूर जिल्ह्याची लोकसंख्या २४,५४,१९६ होती. लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्याला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा मिळावा, यासाठी मागणी अनेक वर्षांपासून सुरू आहे. उमाकांत दांगट समितीने उदगीर जिल्ह्याची शिफारस केली असून, लातूर जिल्ह्यातील उदगीर, अहमदपूर, देवणी, आणि जळकोट तसेच नांदेड जिल्ह्यातील मुखेड आणि देगलूर तालुक्यांना समाविष्ट करून, मुक्रमाबाद किंवा बाऱ्हाळी नावाचा नवीन तालुका तयार करण्याची योजना आहे. २६ जानेवारी २०२५ रोजी उदगीर जिल्ह्याची घोषणा होण्याची शक्यता2 वर्तवली जात आहे.
दरम्यान, नागपूर, पुणे, मुंबईसाठी प्रस्तावित स्लीपर वंदे भारत ट्रेन गुजरातमधील अहमदाबाद ते बोरिवली हे सुमारे 500 किलोमीटरचे अंतर फक्त 5 तासांत पूर्ण करत आहे, ज्याचा वेग ताशी 120 किमीपेक्षा अधिक आहे. या ट्रेनमध्ये प्रवाशांना 1350 रुपयांमध्ये जेवणासह सुविधा दिल्या जातात. मुंबई ते लातूर चालणाऱ्या काही वातानुकूलित (AC) डब्यांसह धावणाऱ्या गाड्यांपैकी, ‘लातूर – मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस ज्याचे तिकीट दर हे AC 3 Tier (3A): साधारणतः ₹905
AC 2 Tier (2A): साधारणतः ₹1,265
First AC (1A): साधारणतः ₹2,100
दरम्यान आहे ही गाडी 500 किलो मिटर अंतर पूर्ण करण्यासाठी नऊ तास लावते.. लातूर जिल्ह्यातील नागरिकांना वंदे भारत ट्रेन सुविधांचा लाभ का दिला जात नाही, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे.
लातूर जिल्ह्यातील २५ लाखांहून अधिक नागरिक, विशेषतः मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये कामानिमित्त स्थलांतरित झालेले आहेत. दिवाळी किंवा शाळेच्या सुट्यांमध्ये हे नागरिक मोठ्या प्रमाणावर मुंबई ते उदगीर, मुखेड इथपर्यंत खाजगी बसेसने प्रवास करतात, जिथे त्यांना दोन हजारांहून अधिक पैसे मोजावे लागतात.तर या राज्यातील मंत्रीमंडळ, विद्यमान खाजदर शिवाजी काळगे,
माजी खाजदार सुधाकर शृंगारे आणि लातूरमधील सहा विधानसभेतील आमदार या समस्यांकडे का लक्ष देत नाहीत, असा सवाल नागरिक विचारत आहेत.
माजी मंत्री संजय बनसोडे यांनी अशा मूलभूत सुविधांसाठी प्रयत्न करणे आवश्यक होते, अशीही नागरिकांमध्ये चर्चा आहे. लातूर जिल्ह्याच्या नागरिकांच्या सुविधांबाबत होणाऱ्या या अन्यायाविरोधात आवाज उठवण्याची गरज असल्याचे जाणवते.
जागृत महाराष्ट्र न्यूज संपादक अमोल भालेराव
लोकशाहीचा गळा घोटणारे गुन्हेगारीकरण
भारतीय लोकशाहीची जगभरात ओळख आहे – जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीमुळे. मात्र, हीच लोकशाही आज एक गंभीर संकटाचा सामना करत आहे. वाढती गुन्हेगारी आणि त्याचा थेट राजकारणाशी झालेला संबंध ही देशासाठी…