उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघांविरुध्द गुन्हा..
उदगीर : प्रतिनिधी
उदगीर शहरातील उदय पेट्रोल पंप उदगीर, अनिल देसाई यांचे रहाते घरी, विजयनगर कॉलनी बिदर रोड, उदगीर येथे विविध शासकीय कार्यालयात नोकरीला लावतो म्हणून २८ लाख २० हजार रुपये घेऊन फसवणूक केली आहे. याप्रकरणी गुरुवारी (९ जानेवारी) दुपारी दोनच्या सुमारास उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ८ जानेवारी २०२४ ते ५ जानेवारी २०२५ दरम्यान उदगीर शहरातील उदय पेट्रोल पंप उदगीर, अनिल देसाई यांचे रहाते घरी, विजयनगर कॉलनी बिदर रोड, उदगीर येथे आरोपीनी संगणमत करून फिर्यादीचा मुलगा इंद्रजित बबन कांबळे यास राज्य उत्पादन शुल्क विभागात, फिर्यादीचे नातेवाईक प्रविण घोलपे यास कृषि विभागात, व मंजुषा पांचाळ हीस पशु संवर्धन विभागात नौकरी लावण्याचे अमिश दाखवुन एकुण २८ लाख २० हजार रुपाये घेवुन फसवणुक केले.
याप्रकरणी पत्रकार बबन ज्ञानोबा कांबळे (रा आशा निवास रो हाऊस नं ०७ बिदर रेल्वे गेट, शेल्हाळ रोड उदगीर ता. उदगीर) यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं. १४/२०२५ कलम ४२०, ३४ भादवि प्रमाणे अनिल दिगांबर देसाई (मुधोळकर), पाटील (पुर्ण नाव माहीती नाही) यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कदम हे करीत आहेत.
हैदराबादमध्ये पुष्पा २ प्रीमियरमुळे चेंगराचेंगरी; अल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला
हैदराबादमधील एका सिनेमागृहात 4 डिसेंबरला पुष्पा २: द रुल या चित्रपटाचा प्रीमियर आयोजित करण्यात आला होता. या प्रीमियरसाठी प्रमुख अभिनेता अल्लू अर्जुन स्वतः उपस्थित होता. प्रीमियरला मोठ्या प्रमाणावर चाहत्यांची गर्दी…