महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या निकालांमुळे महायुतीमधील पक्षांमध्ये आनंदाचे वातावरण असले तरी महाविकास आघाडीसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. विशेषतः अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अपेक्षेपेक्षा अधिक चांगली कामगिरी केली असून, केवळ ५५ जागांवर लढत देत त्यांनी ४१ जागा जिंकल्या आहेत. या यशानंतर अजित पवारांच्या चेहऱ्यावर मिश्किल हास्य असल्याचे विरोधकांच्या नजरेत भरत आहे.
संजय राऊतांची उपरोधिक टिप्पणी
दिल्लीतील पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, “अजित पवार कायम उपमुख्यमंत्री आहेत. ते भविष्यातील किंवा माजी नसून सदैव उपमुख्यमंत्री असतात, हे कौतुकास्पद आहे.” यावेळी त्यांनी अजित पवारांच्या हास्यावर उपहासात्मक टिप्पणी करताना, “गेल्या काही दिवसांपासून ते गॉगल लावून आणि कोट घालून फिरत आहेत. हे हास्य लोकसभा निकालांनंतर थोडेसे हरवले होते. पण आता ते आनंदात दिसत आहेत,” असे विधान केले.
आज दुपारी स्नेहभोजन कार्यक्रमानिम्मित दिल्लीतील पत्रकार बांधवांशी मनमोकळा संवाद साधला. महाराष्ट्रातील तसेच देशभरातील विविध सामाजिक व राजकिय विषयांवर चर्चा झाली.
📍दिल्ली pic.twitter.com/DOsyLuQYON
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) November 28, 2024
शिंदे यांच्यावरही टोमणे
संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका करत, “अजित पवारांचा उगवता सूर्य आहे, तर शिंदे यांचा मावळता सूर्य आहे. मावळतीचा सूर्य झुकताना आणि ढगाआड जाताना दिसतो,” असे सूचक विधान केले.
ईव्हीएमवर उपहास
संजय राऊतांनी ईव्हीएम मशीनबाबत उपरोधिक टीका करत, “ईव्हीएमचे मंदिर बांधावे आणि त्याची पूजा करावी,” असे विधान करत, भाजपाच्या विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.