कळमनुरी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार संतोष बांगर यांनी घेतले मुंबईत चैत्यभूमीचे दर्शन

मुंबई (प्रतिनिधी): हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार संतोष बांगर यांनी आज मुंबईत दादर येथील चैत्यभूमीला भेट देऊन बौद्ध पद्धतीने परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले आणि अभिवादन केले. 

नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत संतोष बांगर यांनी कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून तब्बल 31,000 मताधिक्याने विजय मिळवला. आमदार म्हणून विजयानंतर प्रथमच मुंबईला आल्यावर त्यांनी चैत्यभूमीवर जाऊन महाकारूणीक तथागत भगवान बुद्ध आणि बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना वंदन केले. 

आमदार बांगर हे आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते असून, कळमनुरी विधानसभा मतदारसंघात त्यांनी पूज्य भदंत चंद्रमणी महास्थविर यांच्या नावाने भव्य बुद्ध विहार व विपस्सना ध्यान केंद्राची स्थापना केली आहे. या केंद्रासाठी त्यांनी स्वतःची चार एकर जमीन दान केली असून, या उपक्रमामुळे बौद्ध समुदायामध्ये त्यांच्याबद्दल विशेष आदर निर्माण झाला आहे. 

भदंत चंद्रमणी महास्थविर ध्यानसाधना केंद्राला भविष्यात तीर्थक्षेत्र म्हणून विकसित करण्याचा निर्धार आमदार बांगर यांनी व्यक्त केला. त्यांचा हा उपक्रम बौद्ध धम्म प्रसारासाठी महत्त्वाचा टप्पा ठरेल, असा विश्वास बौद्ध समाज व्यक्त करत आहे.

  • Related Posts

    ९८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत संपन्न – उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते

    नवी दिल्ली येथे २१ फेब्रुवारी २०२५ रोजी ९८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले. या संमेलनाचे उद्घाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले, तर अध्यक्षपद सुप्रसिद्ध…

    80 एकरांत 750 कोटींतून साकारतेय रामायण पार्क, उद्यानात प्रभू श्रीरामांची 151 फूट उंच मूर्ती उभारणार!

    अयोध्येत 80 एकर क्षेत्रावर सुमारे 750 कोटींच्या खर्चातून रामायण पार्क उभारला जात आहे. या भव्य प्रकल्पाचे मुख्य आकर्षण म्हणजे 151 फूट उंचीची प्रभू श्रीरामांची मूर्ती. रामायण थीमवर आधारित या पार्कमध्ये…

    Leave a Reply

    You Missed

    सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?;आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

    सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?;आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

    शिक्षिकेच्या निष्काळजीपणामुळे बारावीचे पेपर जळाले; विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात….!

    शिक्षिकेच्या निष्काळजीपणामुळे बारावीचे पेपर जळाले; विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात….!

    “जागृत महाराष्ट्र न्यूज” मध्ये नवीन नियुक्त्या – गणेश भालेराव सह-संपादक तर सुभाष पगारे कायदे सल्लागार

    “जागृत महाराष्ट्र न्यूज” मध्ये नवीन नियुक्त्या – गणेश भालेराव सह-संपादक तर सुभाष पगारे कायदे सल्लागार

    “महाराष्ट्रातील प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांवर कारवाई” – मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाम निर्णय

    “महाराष्ट्रातील प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांवर कारवाई” – मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाम निर्णय

    वक्फची जागा, भाजपचा दबाव की राजकीय निर्णय? रवींद्र धंगेकर यांचे स्पष्टीकरण…

    वक्फची जागा, भाजपचा दबाव की राजकीय निर्णय? रवींद्र धंगेकर यांचे स्पष्टीकरण…

    युक्रेनचा रशियावर मोठा हल्ला – शांतता चर्चेच्या आधीच जेलेंस्कींकडून दगा?

    युक्रेनचा रशियावर मोठा हल्ला – शांतता चर्चेच्या आधीच जेलेंस्कींकडून दगा?

    “मारल्या होत्या थापा भारी, महाराष्ट्र कर्जबाजारी!” – उद्धव ठाकरेंची अर्थसंकल्पावर जोरदार टीका !

    “मारल्या होत्या थापा भारी, महाराष्ट्र कर्जबाजारी!” – उद्धव ठाकरेंची अर्थसंकल्पावर जोरदार टीका !

    गोरेगावमध्ये भीषण आग; अनेक झोपड्या, गोदामे आणि दुकाने जळून खाक

    गोरेगावमध्ये भीषण आग; अनेक झोपड्या, गोदामे आणि दुकाने जळून खाक

    चॅम्पियन्स ट्रॉफी 2025: भारताचा दणदणीत विजय, रोहित-विराटचा भरमैदानात दांडिया सेलिब्रेशन!

    चॅम्पियन्स ट्रॉफी 2025: भारताचा दणदणीत विजय, रोहित-विराटचा भरमैदानात दांडिया सेलिब्रेशन!