1. एसटी दरवाढ प्रकरण:
महायुती सरकारच्या एसटी दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही दरवाढ सरकारची नाही, तर अधिकाऱ्याच्या चुकीचा परिणाम असल्याचे सांगितले. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी यावरून सरकारवर जोरदार टीका केली आहे.
2. 26/11 आरोपी तहव्वुर राणा भारतात येणार:
26/11 च्या मुंबई हल्ल्याचा आरोपी तहव्वुर राणा याला भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. डेव्हिड हेडलीसोबत त्याने मुंबईवरील हल्ल्याची योजना आखली होती.
3. महाराष्ट्रात बर्ड फ्लूचा धोका:
राज्यभर बर्ड फ्लूचा हाय अलर्ट जारी करण्यात आला असून इन्फ्लूएंझा विषाणूमुळे गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. प्रशासन नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करत आहे.
4. अण्णा हजारे यांचा मतदारांना संदेश:
अण्णा हजारे यांनी दिल्ली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना योग्य उमेदवार निवडण्याचे आवाहन केले आहे. भ्रष्ट विचारांचे लोक सत्तेत येऊ नयेत यासाठी सतर्क राहण्याचा इशारा त्यांनी दिला.
5. ‘छावा’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात:
विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांचा ‘छावा’ चित्रपट वादात सापडला आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे लेझीम नृत्यातील चित्रण अयोग्य असल्याचे संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले आहे.
अशा थोडक्यात घडामोडींसाठी वाचा ‘जागृत महाराष्ट्र न्यूज!’
खराब रस्त्यांमुळे अपघात: लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्याची गरज
भारतामध्ये रस्ते अपघात हा एक गंभीर विषय बनला आहे. वर्षभरात झालेल्या अपघातांमध्ये १८ ते ३४ वयोगटातील तरुणांची संख्या चिंताजनक आहे. २०२४ मध्ये भारतात सुमारे १.८० लाख लोकांनी रस्ते अपघातांमध्ये आपला…