
सकल हिंदू समाज मोठ्या संख्येने सहभागी
जिंतूर प्रतिनिधी
बांगलादेशा मध्ये झालेल्या सत्तातरानंतर त्या ठिकाणी अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अत्याचार करण्यात येत असल्यामुळे त्याच्या निषेधार्थ दिनांक 10 डिसेंबर रोज जिंतूर शहरातून भव्य मूकमोर्चा काढण्यात आला यावेळी मोर्च्यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती
बांगलादेशात सत्तातर झाल्या पासून कट्टरपंथीय लोकांनी अल्पसंख्याक असलेल्या हिंदू समाजाला टार्गेट करणे सुरू केले आहे यात मोठ्या प्रमाणात अत्याचार करण्यात येत आहेत परिणामी हिंदू भयभीत झाले त्यातच कट्टरपंथी नेते बेताल वक्तव्य करून हिंदू विरोधी भडकवत आहेत यामुळेच अनेक हिंदू लोकांनी मृत्यूला कवटाळले असल्याच्या घटना समोर आल्या आहेत म्हणून शहरातील सकल हिंदू समाज एकत्र येत भव्य न्याय मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते हा मूक मोर्च्या बाजार समितीच्या आवारातुन निघून नृसिंह चौक,मेन चौक,पोलीस ठाणे,छत्रपती शिवाजी महाराज चौक,येथून थेट तहसील कार्यालया समोर पोहचला यावेळी सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चाचे रूपांतर सभेत झाले यावेळी अनेकांनी आपापली मनोगत व्यक्त केली दरम्यान तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले या मोर्च्यात महिलांची संख्या लाक्षणिक होती यावेळी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस निरीक्षक बुद्धिराज सुकाळे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
“बांगलादेशात होत असलेल्या हिंदूंवरील अत्याचाराचा निषेध नोंदविण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने मूक मोर्च्याचे आयोजन केले असल्यामुळे शहरातील व्यापाऱ्यांनी स्वयंपूर्तीने आपली दुकाने बंद ठेऊन मोर्च्यास पाठिंबा दिला”