महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) प्रभाग क्रमांक ४९, मुंबईचे शाखा अध्यक्ष सुनिल घोंगे यांचा चारोटीजवळ २५ नोव्हेंबर २०२४ रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास भीषण अपघात झाला. घोंगे आपल्या सहकारी चंद्रेश पटेल यांच्यासोबत काही कामासाठी सुरतच्या दिशेने प्रवास करत होते.
अपघाताचा प्रमुख कारण राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याचे काम व रस्त्याचा अंदाज न येणे होते. कार दुभाजकावर जोरात आदळल्याने गाडीचे इंजिन अक्षरशः दोन भागांत विभागले. या अपघातामुळे दोघेही जखमी झाले आहेत.
सुनिल घोंगे आणि चंद्रेश पटेल यांना तत्काळ वापी येथील हरिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या दोघांचीही प्रकृती स्थिर असून, ते उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत.
या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयात गर्दी केली आहे. सुनिल घोंगे यांच्या प्रकृतीसाठी पक्षातील वरिष्ठ नेत्यांसह कार्यकर्ते प्रार्थना करत आहेत.
जागृत महाराष्ट्र न्यूज संपादक अमोल भालेराव