मालाड विधानसभा पश्चिमेत उद्या होणाऱ्या मतदानासाठी सुरक्षा व्यवस्थेची तयारी पूर्ण झाली आहे. मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पोलिंग बूथवर पोलीस बंदोबस्त तैनात असेल.
सुरक्षेची व्यवस्था:
– मढ येथील बोनावेंचर शाळा बूथ:
– 1 पोलीस निरीक्षक (PI)
– 3 पोलीस उपनिरीक्षक (PSI)
– 1 सहायक पोलीस निरीक्षक (ASI)
– 11 अंमलदार
– 1 होमगार्ड
– येरंगळ पोलिंग बूथ:
– 1 PSI
– 10 अंमलदार
मतदान केंद्रांची माहिती:
– मढ: 10 बूथ
– राहेजा: 2 बूथ
– येरंगळ: 6 बूथ
– पटेल वाडी: 5 बूथ
राजकीय लढत:
मालाड विधानसभेत महाविकास आघाडीच्या काँग्रेस उमेदवार असलम शेख (तीन टर्म आमदार) आणि मालाड पूर्वचे माजी नगरसेवक व महायुती उमेदवार विनोद शेलार यांच्यात थेट लढत आहे.
निकाल:
मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी होणार असून, मालाडच्या जनतेचा कौल कोणाला मिळेल याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.
मतदार संख्या आणि मतदानाचा अंदाज:
वॉर्ड 49 मध्ये 27,000 पेक्षा अधिक मतदार असून, पूर्ण मालाड विधानसभेतील मतदान हे 2 लाख पन्नास हजार पेक्षा अधिक आहे..2019 मध्ये 10 हजार 383 मताने असलम शेख यांचा विजय झाला होता..यंदा मतदान टक्केवारीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मतदान सुरळीत पार पडण्यासाठी चोख बंदोबस्त व नियोजन करण्यात आले आहे.
जागृत महाराष्ट्र न्यूज संपादक अमोल भालेराव मालाड,मुंबई