राज्यात निवडणूक प्रचारात नेत्यांच्या बॅगांची तपासणी, विरोधकांनी साधला निशाणा

राज्यात निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू असून नेत्यांचे दौरेही जोरात सुरू आहेत. या काळात प्रचारासाठी नेते हवाई मार्गाचा वापर करत आहेत, त्यामुळे हवाई उड्डाणांच्या सोयीचा लाभ घेतला जातोय. निवडणूक काळात पैशांचा अपहार होऊ नये, म्हणून विविध ठिकाणी कठोर तपासणी केली जात आहे. हॅलिपॅडवरून प्रवास करणाऱ्या नेत्यांच्या बॅगांचीही तपासणी होत आहे.

दोन दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली होती, त्यावरून त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. परंतु आता देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅगांचीही तपासणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री शिंदे पालघर दौऱ्यावर असताना त्यांची बॅग तपासण्यात आली. यावेळी शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला हाणत म्हटले, “माझ्या बॅगेत फक्त कपडे आहेत, युरिन पॉट नाही.” उद्धव ठाकरे यांच्या बॅग तपासणीवरून शरद पवारांनी देखील टीका केली होती.

अजित पवार यांनी देखील आपल्या तपासणीबद्दल प्रतिक्रिया देत एक्स (मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म) वर व्हिडिओ शेअर केला. ते म्हणाले, “आज माझ्या बॅग व हेलिकॉप्टरची निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासणी केली. मी त्यांना पूर्ण सहकार्य केलं. स्वतंत्र व निष्पक्ष निवडणुका घेण्यासाठी अशा उपाययोजना आवश्यक आहेत, आणि कायद्याचा आदर करून निवडणूक आयोगाच्या प्रयत्नांना सहकार्य करायला हवं.”

विरोधकांनी या तपासणीवरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली असून, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा उफाळण्याची शक्यता आहे.

  • Related Posts

    झटका मटण विक्रीसाठी मल्हार सर्टिफिकेटचा प्रस्ताव त्वरित रद्द करावा, महाराष्ट्र क्रांती संघटनेचे मुख्यमंत्री यांना निवेदन !

    महाराष्ट्र क्रांती संघटनेने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक निवेदन सादर करून झटका मटण विक्रीसाठी देण्यात येणाऱ्या मल्हार सर्टिफिकेटचा प्रस्ताव त्वरित रद्द करण्याची मागणी केली आहे. मंत्री नितेश राणे यांनी…

    नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुनर्जन्म? भाजपा खासदाराच्या विधानावर वादंग..!

    लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण ईश्वरीय आदेशाने आलो असल्याचं विधान केलं होतं. त्यावर मोठी चर्चा आणि विरोधकांकडून टीका झाली होती. त्याच पार्श्वभूमीवर आता भाजपाचे ओडिशातील खासदार प्रदीप पुरोहित…

    Leave a Reply

    You Missed

    MH/BASSEIN आणि NEELAM क्षेत्र “नो फिशिंग झोन” – भारतीय नौसेनेकडून आदेश, मत्स्यव्यवसाय विभागाचा शासन निर्णय जाहीर

    MH/BASSEIN आणि NEELAM क्षेत्र “नो फिशिंग झोन” – भारतीय नौसेनेकडून आदेश, मत्स्यव्यवसाय विभागाचा शासन निर्णय जाहीर

    भारत-पाकिस्तान संघर्ष: 9 मे 2025 च्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे

    भारत-पाकिस्तान संघर्ष: 9 मे 2025 च्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे

    भारत-पाकिस्तान सीमेवर तणाव: मुंबईचा जवान मुरली नाईक देशासाठी शहीद

    भारत-पाकिस्तान सीमेवर तणाव: मुंबईचा जवान मुरली नाईक देशासाठी शहीद

    भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर युद्धजन्य तयारीला वेग; संरक्षण मंत्रालय आणि गृहमंत्रालयाची महत्त्वपूर्ण पावले

    भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर युद्धजन्य तयारीला वेग; संरक्षण मंत्रालय आणि गृहमंत्रालयाची महत्त्वपूर्ण पावले

    “तोफांचा वर्षाव, मिसाईलचा मारा आणि पाण्याचा पुर – पाकिस्तानवर तिन्ही बाजूंनी हल्ला!”

    “तोफांचा वर्षाव, मिसाईलचा मारा आणि पाण्याचा पुर – पाकिस्तानवर तिन्ही बाजूंनी हल्ला!”

    पंजाब-दिल्ली सामना अर्धवट; प्लेऑफचं गणित गुंतागुंतीचं, इतर संघांमध्ये वाढली धाकधूक

    पंजाब-दिल्ली सामना अर्धवट; प्लेऑफचं गणित गुंतागुंतीचं, इतर संघांमध्ये वाढली धाकधूक

    सीमेवर तणाव ! भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषेवर गोळीबार, ड्रोन हल्ले – एक जवान शहीद

    सीमेवर तणाव ! भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषेवर गोळीबार, ड्रोन हल्ले – एक जवान शहीद

    पाकड्यांचा डाव पुन्हा फसला! नियंत्रण रेषेजवळ ५० हून अधिक ड्रोन हवेतच उडवले, भारतीय लष्कराने पोस्ट केलेला Video व्हायरल..

    पाकड्यांचा डाव पुन्हा फसला! नियंत्रण रेषेजवळ ५० हून अधिक ड्रोन हवेतच उडवले, भारतीय लष्कराने पोस्ट केलेला Video व्हायरल..

    भारताचं ऑपरेशन सिंदूर सुरुच; HQ-9 एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त, लाहोरचं हवाई छत्र गायब!

    भारताचं ऑपरेशन सिंदूर सुरुच; HQ-9 एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त, लाहोरचं हवाई छत्र गायब!