पुन्हा एका शेतकऱ्यांने मृत्यूस कवटाळले – जोगवाडा येथील घटना

जिंतूर प्रतिनिधी

तालुक्यातील जोगवाडा येथील रहिवासी असलेल्या एका 50 वर्षीय शेतकऱ्याने सततची नापिकी व कर्जाच्या डोंगरामुळे  घरातील लाकडाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना गुरूवार दि १० आक्टोंबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास उघडकीस घडलीया घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मागील अनेक वर्षांपासून होत असलेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे उत्पन्नात कमालीची घट व त्यातही शेतमालाला अल्पभाव या कारणाने तालुक्यातील शेतकरी हतबल झाला आहे उसनवारी करून घेतलेले बियाणांचे खर्च देखील या वेळेस निघत नसल्याने संबधित शेतकरी अडचणीत आला होता सततची नापिकी  आणि खाजगी कर्ज आणि बँकेचे कर्जाला कंटाळून जोगवाडा येथील आश्रोबा लाखाडे वय 50 वर्ष शेतकऱ्याने घरातील पत्राखालील लाकडाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार घरच्या मंडळीच्या लक्षात आल्यानंतर  सदर घटनेची माहिती चारठाणा पोलीसाना देण्यात आली.  घटनास्थळी साहाय्यक  साहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल अंधारे पोहेकाॅ.सूर्यकांत  केजगीर, रामकिशन कोंडरे अदींनी घटनास्थळी भेट घेऊन  आश्रोबा लाखाडे याना खाली घेऊन जिंतूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डाॅक्टरांनी तपासून मृत घोषित केले. मयताचे शवविच्छेदन जिंतूर ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले आहे. मयताच्या  पश्चात पत्नी,दोन मुलं  दोन मुली असा परिवार आहे. या प्रकरणी मयताचा मुलगा गजानन लाखाडे याच्या तक्रारी वरून  चारठाणा पोलीस ठाण्यात अकास्मीत मुत्युची नोंद करण्यात आली आहे

  • Related Posts

    सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या

    सकल मराठा समाजाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन जिंतूर प्रतिनिधी: बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे तरुण सरपंच व मराठा आरक्षण चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते संतोष अण्णा देशमुख यांचे अपहरण करून खून…

    बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या विरोधात भव्य मोर्चा

    सकल हिंदू समाज मोठ्या संख्येने सहभागी जिंतूर प्रतिनिधीबांगलादेशा मध्ये झालेल्या सत्तातरानंतर त्या ठिकाणी अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अत्याचार करण्यात येत असल्यामुळे त्याच्या निषेधार्थ दिनांक 10 डिसेंबर रोज जिंतूर शहरातून…

    Leave a Reply

    You Missed

    सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?;आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

    सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?;आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

    शिक्षिकेच्या निष्काळजीपणामुळे बारावीचे पेपर जळाले; विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात….!

    शिक्षिकेच्या निष्काळजीपणामुळे बारावीचे पेपर जळाले; विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात….!

    “जागृत महाराष्ट्र न्यूज” मध्ये नवीन नियुक्त्या – गणेश भालेराव सह-संपादक तर सुभाष पगारे कायदे सल्लागार

    “जागृत महाराष्ट्र न्यूज” मध्ये नवीन नियुक्त्या – गणेश भालेराव सह-संपादक तर सुभाष पगारे कायदे सल्लागार

    “महाराष्ट्रातील प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांवर कारवाई” – मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाम निर्णय

    “महाराष्ट्रातील प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांवर कारवाई” – मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाम निर्णय

    वक्फची जागा, भाजपचा दबाव की राजकीय निर्णय? रवींद्र धंगेकर यांचे स्पष्टीकरण…

    वक्फची जागा, भाजपचा दबाव की राजकीय निर्णय? रवींद्र धंगेकर यांचे स्पष्टीकरण…

    युक्रेनचा रशियावर मोठा हल्ला – शांतता चर्चेच्या आधीच जेलेंस्कींकडून दगा?

    युक्रेनचा रशियावर मोठा हल्ला – शांतता चर्चेच्या आधीच जेलेंस्कींकडून दगा?

    “मारल्या होत्या थापा भारी, महाराष्ट्र कर्जबाजारी!” – उद्धव ठाकरेंची अर्थसंकल्पावर जोरदार टीका !

    “मारल्या होत्या थापा भारी, महाराष्ट्र कर्जबाजारी!” – उद्धव ठाकरेंची अर्थसंकल्पावर जोरदार टीका !

    गोरेगावमध्ये भीषण आग; अनेक झोपड्या, गोदामे आणि दुकाने जळून खाक

    गोरेगावमध्ये भीषण आग; अनेक झोपड्या, गोदामे आणि दुकाने जळून खाक

    चॅम्पियन्स ट्रॉफी 2025: भारताचा दणदणीत विजय, रोहित-विराटचा भरमैदानात दांडिया सेलिब्रेशन!

    चॅम्पियन्स ट्रॉफी 2025: भारताचा दणदणीत विजय, रोहित-विराटचा भरमैदानात दांडिया सेलिब्रेशन!