हजपूर्वी सौदी अरेबियाचं मोठं पाऊल: पाकिस्तानसह १४ देशांवर व्हिसा बंदी !

रियाध | सौदी अरेबियाने एक महत्त्वाचा आणि दूरगामी परिणाम करणारा निर्णय घेतला असून भारत, पाकिस्तान, बांग्लादेश, इजिप्तसह १४ देशांच्या नागरिकांना देण्यात येणाऱ्या तात्पुरत्या व्हिसावर बंदी घातली आहे. या निर्णयामुळे या देशांतील नागरिकांना उमरा (छोटा हज), व्यवसायिक दौरे आणि कौटुंबिक भेटींसाठी व्हिसा मिळणं सध्या शक्य होणार नाही.

सौदीच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही घोषणा केली असून या निर्बंधांची अंमलबजावणी तातडीने करण्यात आली आहे आणि हे निर्बंध जून २०२५ पर्यंत लागू राहतील, अशी अधिकृत माहिती समोर आली आहे.

१३ एप्रिलपर्यंत प्रवेश मुभा

ज्यांच्याकडे याआधीच उमरा व्हिसा आहे, अशा नागरिकांना १३ एप्रिल २०२५ पर्यंत सौदी अरेबियात प्रवेश करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र त्यानंतर कोणत्याही तात्पुरत्या व्हिसावर प्रवेश बंद करण्यात येणार आहे.

निर्णयामागील पार्श्वभूमी – सुरक्षा आणि व्यवस्थापन हाच उद्देश

सौदी अरेबियातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं की, या निर्णयामागे धार्मिक यात्रेच्या सुरक्षिततेचे कारण असून, अनधिकृत आणि नोंदणी न केलेल्या यात्रेकरूंची वाढती संख्या मोठा धोका ठरू शकते.
गेल्या वर्षी हज यात्रेदरम्यान अत्यधिक उष्णतेमुळे हजारो लोकांना त्रास झाला, तर अनेकांचा दुर्दैवी मृत्यूही झाला. हज यात्रेवेळी अनेकांनी योग्य नोंदणी न करता देशात प्रवेश केल्याचेही निदर्शनास आले.

यामुळे यंदाच्या हजपूर्वीच सौदी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून उमरा आणि इतर तात्पुरत्या व्हिसांवर काही काळासाठी बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

सौदी सरकारकडून विशेष उपाययोजना

सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी याबाबत थेट निर्देश दिले असून, यंदा हज यात्रेचं व्यवस्थापन अधिक काटेकोरपणे करण्यात येणार आहे.
तसेच, स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर, यात्रेकरूंची पूर्व-नोंदणी, तसेच सुरक्षा आणि वैद्यकीय व्यवस्थांमध्ये मोठी गुंतवणूक करण्याचे संकेत मिळाले आहेत.

कोणकोणते आहेच बंदी लागू असलेले देश ?

या निर्णयामुळे खालील १४ देशांच्या नागरिकांवर तात्पुरती व्हिसा बंदी लागू करण्यात आली आहे:

भारत

पाकिस्तान

बांग्लादेश

इजिप्त

इंडोनेशिया

इराक

नायजेरिया

जॉर्डन

अल्जेरिया

सुदान

इथिओपिया

ट्युनिशिया

येमेन

लीबिया

भारतीय मुस्लीम बांधवांमध्ये चिंता

या निर्णयामुळे भारतात अनेक मुस्लीम कुटुंबांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. अनेकांनी रमजान महिन्यात उमरासाठी तयारी केली होती, तर काहींनी हजपूर्वी सौदीत जाऊन नातेवाईकांना भेटण्याचं नियोजन केलं होतं. आता हे सर्व नियोजन काही काळासाठी स्थगित करणं आवश्यक ठरणार आहे.

सौदी प्रशासनाकडून हे निर्बंध हज यात्रा संपेपर्यंत लागू राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन नव्याने निर्णय घेण्यात येईल, असं संकेत मिळाले आहेत. दरम्यान, सौदी अरेबियामध्ये प्रवेशासाठी नागरिकांनी फक्त अधिकृत आणि नोंदणीकृत मार्गांचा वापर करावा, असं आवाहन देखील करण्यात आलं आहे.

  • Related Posts

    फ्लोरिडा विद्यापीठात गोळीबाराची घटना: दोघांचा मृत्यू, ६ जण जखमी

    तल्लाहासी (फ्लोरिडा): फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये गुरुवारी रात्री भीषण गोळीबाराची घटना घडली, ज्यात दोन जणांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. गोळीबार विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या इमारतीबाहेर रात्री 11:50…

    “देवदूत की मृत्यूदूत?” – जर्मनीतील डॉक्टरने मौजमजेसाठी केली 15 रुग्णांची हत्या!

    डॉक्टर म्हणजे जीव वाचवणारा… पण जर तोच डॉक्टर जीव घेऊ लागला, तर ? जर्मनीमधून समोर आलेली ही घटना थरकाप उडवणारी आहे. जो डॉक्टर रुग्णांचे दुःख कमी करतो, त्यानेच आपल्या विकृत…

    Leave a Reply

    You Missed

    १७ महिन्यांचा एकाग्र झाला कोट्यधीश; नारायण मूर्ती यांच्या नातवाची १० कोटींपेक्षा अधिक कमाई !

    १७ महिन्यांचा एकाग्र झाला कोट्यधीश; नारायण मूर्ती यांच्या नातवाची १० कोटींपेक्षा अधिक कमाई !

    फ्लोरिडा विद्यापीठात गोळीबाराची घटना: दोघांचा मृत्यू, ६ जण जखमी

    फ्लोरिडा विद्यापीठात गोळीबाराची घटना: दोघांचा मृत्यू, ६ जण जखमी

    “बाळासाहेब असते, तर हे वागणं सहन केलं नसतं!”, नाव न घेता शिंदेंचा पुन्हा ठाकरेंवर हल्लाबोल

    “बाळासाहेब असते, तर हे वागणं सहन केलं नसतं!”, नाव न घेता शिंदेंचा पुन्हा ठाकरेंवर हल्लाबोल

    महिला वकिलावर अमानुष हल्ला: सरपंचासह 10 जणांविरोधात गुन्हा दाखल!

    महिला वकिलावर अमानुष हल्ला: सरपंचासह 10 जणांविरोधात गुन्हा दाखल!

    “देवदूत की मृत्यूदूत?” – जर्मनीतील डॉक्टरने मौजमजेसाठी केली 15 रुग्णांची हत्या!

    “देवदूत की मृत्यूदूत?” – जर्मनीतील डॉक्टरने मौजमजेसाठी केली 15 रुग्णांची हत्या!

    राज्यात हिंदी सक्तीविरोधात मनसे आक्रमक; रस्त्यावर उतरण्याचा इशारा !

    राज्यात हिंदी सक्तीविरोधात मनसे आक्रमक; रस्त्यावर उतरण्याचा इशारा !

    “पत्नीला मूल होत नाही म्हणून तहसीलदाराची राक्षसी वागणूक – धक्कादायक गुन्ह्याचा उलगडा”

    “पत्नीला मूल होत नाही म्हणून तहसीलदाराची राक्षसी वागणूक – धक्कादायक गुन्ह्याचा उलगडा”

    महागाईत मोठी घसरण; सर्वसामान्यांना मोठा दिलासा !

    महागाईत मोठी घसरण; सर्वसामान्यांना मोठा दिलासा !

    शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय; ‘लाडका शेतकरी योजनेंतर्गत’ प्रत्येक शेतकऱ्याला ६ हजारांची मदत जाहीर !

    शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय; ‘लाडका शेतकरी योजनेंतर्गत’ प्रत्येक शेतकऱ्याला ६ हजारांची मदत जाहीर !