महाराष्ट्रात विडंबनाच्या नावाखाली अपमान सहन करणार नाही. – फडणवीसांचा इशारा!

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं तयार करून ते आपल्या शोमध्ये सादर केलं. या प्रकारावरून मोठा वाद निर्माण झाला असून, शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. तसेच कुणाल कामरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली असून, त्यांनी कुणाल कामराला माफी मागण्याची मागणी केली आहे. तसेच, स्वातंत्र्याचा स्वैराचार सहन केला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “स्टँडअप कॉमेडी करण्याचा अधिकार कोणालाही आहे, मात्र अपमान करण्याचा अधिकार नाही.” त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, महाराष्ट्रातील जनतेने २०२४ मध्ये कोण गद्दार आणि कोण खुद्दार आहे, हे ठरवलं आहे.

त्यांच्या मते, “हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची खरी विचारधारा कोण पुढे नेत आहे, हे जनता ओळखते. त्यामुळे अशा प्रकारे खालच्या स्तरावर जाऊन माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अपमान करणं चुकीचं आहे.”

कामराने माफी मागावी – फडणवीस

मुख्यमंत्री फडणवीस यांनी कुणाल कामराने संविधानाचा संदर्भ दिल्याबद्दलही प्रतिक्रिया दिली. “संविधानाने व्यक्तिस्वातंत्र्य दिलं असलं, तरी त्याचा गैरवापर करता येणार नाही. दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण करता येणार नाही,” असं ते म्हणाले. त्यामुळे “कुणाल कामराने माफी मागावी,” अशी मागणी त्यांनी केली.

“योग्य ती कायदेशीर कारवाई होईल” – फडणवीस

फडणवीस यांनी पुढे स्पष्ट केलं की, “कोणीही स्टँडअप कॉमेडीच्या नावाखाली एखाद्या नेत्याला गद्दार म्हणू शकत नाही.” बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्या लोकांवर जनतेनेच निकाल दिला आहे, असं ते म्हणाले.

“जर जाणूनबुजून कोणाचा अपमान करण्याचा प्रयत्न होत असेल, तर ते सहन केलं जाणार नाही. योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल,” असा इशाराही त्यांनी दिला.

कुणाल कामराने केलेल्या विडंबनावरून मोठा वाद निर्माण झाला असून, शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावर कठोर भूमिका घेतली असून, कामराने माफी मागावी आणि कायदेशीर कारवाई केली जाईल, असं स्पष्ट केलं आहे.

  • Related Posts

    CSMT स्थानकात मोठा अपघात टळला: क्लिनिंग मशीन रुळावर कोसळली, मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला

    मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकात मंगळवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली आणि मोठा अपघात टळला. प्लॅटफॉर्म क्रमांक ७ वरून प्लॅटफॉर्म स्वच्छतेसाठी वापरली जाणारी इलेक्ट्रिक बॅटरीवर चालणारी क्लिनिंग मशीन…

    Leave a Reply

    You Missed

    उदगीर: भरधाव ट्रॅव्हल्सची धडक – तरुणाचा जागीच मृत्यू

    उदगीर: भरधाव ट्रॅव्हल्सची धडक – तरुणाचा जागीच मृत्यू

    सरन्यायाधीश भूषण गवई यांचा पहिला मोठा निर्णय: नारायण राणेंना झटका, पुण्यातील 30 एकर वनजमीन परत मिळणार

    सरन्यायाधीश भूषण गवई यांचा पहिला मोठा निर्णय: नारायण राणेंना झटका, पुण्यातील 30 एकर वनजमीन परत मिळणार

    अंबड येथे भरदिवसा घरफोडीचा प्रकार — दोन अनोळखी व्यक्तींकडून घरफोडी करून चोरी

    अंबड येथे भरदिवसा घरफोडीचा प्रकार — दोन अनोळखी व्यक्तींकडून घरफोडी करून चोरी

    अंबड ST बस स्थानकावर तरुणावर मारहाणीचा प्रकार — जिवे मारण्याच्या धमक्या देत सार्वजनिक ठिकाणी गोंधळ

    अंबड ST बस स्थानकावर तरुणावर मारहाणीचा प्रकार — जिवे मारण्याच्या धमक्या देत सार्वजनिक ठिकाणी गोंधळ