
बीडमधल्या शिरुर तालुक्यातील एका व्यक्तीला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे नाव सतीश भोसले असल्याचे समोर आले आहे. सतीश भोसले हा भाजपचे आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय असल्याचे म्हटले जात असून सतीश भोसले उर्फ खोक्या गुन्हेगारी क्षेत्रात सक्रीय असल्याचे समोर आले आहे.
तसेच सतीश भोसले हा राजकारणात सक्रीय असून भाजपाच्या महाराष्ट्र भटक्या विमुक्त आघाडीचे पद त्याच्याकडे आहे. सतीशने महेश ढाकणे या तरुणाला बॅटने जबर मारहाण केली होती. या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण समोर आले. सतीशने ढाकणे याचे वडील दिलीप ढाकणे यांना दात तुटेपर्यंत मारहाण केली होती.
याचदरम्यान सतीश भोसले म्हणजेच खोक्या हा गुन्हेगारी विश्वात सक्रीय असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्याच्यावर बीड जिल्ह्यातील अमळनेर, शिरुर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सतीश उर्फ खोक्या याच्यावर २०२१ मध्ये कलम ३०७ अंतर्गत प्रयत्नात्मक खुन (Attempt to Murder), २०२० मध्ये कलम ४९८ अ अंतर्गत कौटुंबिक गुन्हा (Family Crime) व २०२० मध्ये कलम ३०४ अंतर्गत ठार मारण्यचा प्रयत्न नसताना घडलेला मृत्यू (Culpable Homicide Not Amounting to Murder) असे आर्मी Act नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
सोशल मीडियावर सतीश भोसले याचे काही व्हिडिओज व्हायरल होत आहेत. त्यातील एका व्हिडिओमध्ये तो कारमध्ये बसून नोटांची बंडलं फेकताना दिसत आहे. तर दुसऱ्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये सतीश हॅलिकॉप्टरमधून उतरताना दिसतो. त्यामुळे या खोक्या उर्फ सतीश भोसले याचा माज उतरवण्यासाठी पोलीसांची दोन पथके रवाना झाली असल्याची माहिती समोर आली आहे.