
नवी दिल्ली येथे २१ फेब्रुवारी २०२५ रोजी ९८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले. या संमेलनाचे उद्घाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले, तर अध्यक्षपद सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. तारा भवाळकर यांनी भूषविले.
या संमेलनाचे प्रमुख उद्दिष्ट मराठी साहित्य आणि संस्कृतीला चालना देणे, लेखक, कवी, आणि साहित्यप्रेमींना संवादाचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे असे होते. मात्र, या संमेलनाला राजकीय वादाचे गालबोट लागले. साहित्याशी संबंध नसलेल्या काही आमंत्रित पाहुण्यांच्या सहभागावरून टीका सुरू झाली आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर एक पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. मूळचे शिक्षक असलेले ज्ञानेश्वर जमदाडे यांनी या संदर्भात भाष्य करत, मराठी भाषेला “अभिजात भाषा” म्हणून मान्यता मिळाल्यानंतरही संमेलनात अशा प्रकारच्या घटनांचे घडणे हास्यास्पद असल्याचे मत व्यक्त केले आहे.
या विषयावर तुमचे मत काय? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर कळवा.