महाड तालुक्यात आमदार गोगावले यांना मोठा धक्का: शिंदे गटातील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश

“येतो झाकी है; और बहुत कुछ बाकी है…” – तालुकाध्यक्ष निलेश महाडिक

प्रतिनिधी : रामदास चव्हाण

रायगड : महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुका नुकत्याच जाहीर झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाचा नेता आपला पक्ष मजबूत करण्यासाठी मोर्चेबांधणी करत आहे. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात पक्ष फोडाफोडीचे राजकारण सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यामध्ये आमदार गोगावले यांचा पक्ष अव्वल स्थानावर असून स्नेहल जगताप यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेशाची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे.

शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट हे महायुतीतील घटक पक्ष आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने यापूर्वी कोणताही पक्ष प्रवेश घेतला नव्हता, परंतु महायुतीतील घटक पक्ष शिंदे गट मात्र कार्यकर्त्यांना फोडून आपल्या गटामध्ये सामील करून घेत असल्याचे चित्र स्पष्ट आहे.

आज किंजलोळी खुर्द भालेकर कोंड येथील शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत जाहीर प्रवेश केला. तालुका प्रमुख निलेश महाडिक यांनी यावेळी स्पष्ट केले की, “शिंदे गट व उबाठा गटामध्ये आमच्या पक्षामध्ये अनेक कार्यकर्ते येणार आहेत.”

या पक्षप्रवेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सुभाष निकम, अपेक्षा कारेकर, चंद्रकांत बुवा जाधव, मन्सूर देशमुख, निलेश महाडिक, रिहान देशमुख, राकेश शहा, बाळा सकपाळ, सोनल उतेकर, राजेश जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

  • Related Posts

    केंद्रीय मंत्री रामदास आठवले एन.डी.ए व महायुतीवर नाराज! अधिवेशन अर्धवट सोडून दुबईला सहकुटुंब रवाना

    मुंबई: राज्यात नुकत्याच पार पडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाला (आठवले गट) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन देऊनही मंत्रिपद मिळाले नाही. विशेष म्हणजे, शपथविधी सोहळ्याला देखील…

    संविधान ते महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेता व्हाया स्वा. सावरकर; श्रीकांत शिंदे आणि राहुल गांधी यांच्यात संसदेत तुफान खडाजंगी!

    संविधानाच्या ७५ वर्षांच्या गौरवशाली प्रवासाच्या चर्चेत संसदेत डॉ. श्रीकांत शिंदे आणि राहुल गांधी यांच्यात झालेली खडाजंगी देशाच्या राजकीय वातावरणाला एक नवीन रंग देणारी ठरली आहे. संविधानाच्या योगदानावर चर्चा करताना दोघांनीही…

    Leave a Reply

    You Missed

    शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने हृदयाला छिद्र असलेल्या तब्बल ११५ मुलांची 2D इको तपासणी संपन्न

    शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने हृदयाला छिद्र असलेल्या तब्बल ११५ मुलांची 2D इको तपासणी संपन्न

    महाराष्ट्राच्या पायाभूत प्रगतीला जागतिक ओळख: श्री. अनिलकुमार गायकवाड यांचा ऐतिहासिक सहभाग

    महाराष्ट्राच्या पायाभूत प्रगतीला जागतिक ओळख: श्री. अनिलकुमार गायकवाड यांचा ऐतिहासिक सहभाग

    जागृत महाराष्ट्र न्यूज: दिवसातील महत्त्वाच्या घडामोडी

    जागृत महाराष्ट्र न्यूज: दिवसातील महत्त्वाच्या घडामोडी

    लोकशाहीचा गळा घोटणारे गुन्हेगारीकरण

    लोकशाहीचा गळा घोटणारे गुन्हेगारीकरण

    मालाड:मढ जेट्टी रस्त्याचे काम कासव गतीने ,प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर नागरिक नाराज

    मालाड:मढ जेट्टी रस्त्याचे काम कासव गतीने ,प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर नागरिक नाराज

    खराब रस्त्यांमुळे अपघात: लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्याची गरज

    खराब रस्त्यांमुळे अपघात: लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्याची गरज

    “नागपूर, पुणे, मुंबईसाठी स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेसची घोषणा; लातूरच्या सुविधांकडे दुर्लक्ष, संतप्त नागरिकांचा आक्रोश”

    “नागपूर, पुणे, मुंबईसाठी स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेसची घोषणा; लातूरच्या सुविधांकडे दुर्लक्ष, संतप्त नागरिकांचा आक्रोश”

    मालाड:मढ”तिसाई” नौकाधारक मच्छिमारास ANHUI XINZHOU SHIPPING कडून आर्थिक नुकसान भरपाई मंजूर

    मालाड:मढ”तिसाई” नौकाधारक मच्छिमारास ANHUI XINZHOU SHIPPING कडून आर्थिक नुकसान भरपाई मंजूर

    पत्रकाराच्या मुलाला आणि २ नातेवाईकांना घातला लाखोंचा गंडा

    पत्रकाराच्या मुलाला आणि २ नातेवाईकांना घातला लाखोंचा गंडा