पॅरोलवर सुटलेल्या आरोपीने पत्नीची हत्या; उदगीरमध्ये खळबळ

लातूर : पॅरोलवर सुट्टी घेवून आलेल्या आरोपी पतीने स्वतःच्या पत्नीवर बंदुकीच्या दोन गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना उदगीर शहरात मंगळवारी मध्यरात्री घडली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून, आरोपी फरार झाला आहे.उदगीर शहरातील सोनू उर्फ अमित नाटकरे हा मागील दोन खूनांच्या प्रकरणात जेलमध्ये होता. यातील एका खून प्रकरणात आरोपी सोनू नाटकरे याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. पॅरोलवर सुट्टी घेवून तो उदगीरला आला होता. मागील या दोन केसमध्ये कोर्टात अपील करण्यासाठी पैसे नसल्यामुळे पत्नी भाग्यश्री हिला माहेरहून पैसे घेवून ये म्हणून तिचा सतत छळ करून तिला मारहाण करीत होता. पत्नी समतानगर येथील भीमराव बिरादार यांच्या घरी किरायाने राहत होती.मंगळवारी रात्री आरोपी सोनू नाटकरे याचा आपल्या पत्नीसोबत माहेरहून पैसे आणण्यासाठी वाद झाला. या वादातून त्याने बंदुकीतील गोळ्या पत्नी भाग्यश्रीवर झाडल्या. त्यात भाग्यश्री यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच उदगीर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी व शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे, पोलीस उपनिरीक्षक आर.एम. तारू व सपोनि केंद्रे यांनी भेट देवून पंचनामा केला. घटनेनंतर आरोपी सोनू नाटकरे हा फरार झाला आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक केंद्रे करीत आहेत. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.

  • Related Posts

    अंबरनाथमध्ये भरदिवसा बिल्डरच्या घरावर गोळीबार; परिसरात भीतीचं वातावरण..!

    अंबरनाथ शहरात आज दुपारी एक धक्कादायक आणि थरारक घटना घडली आहे. नामवंत बांधकाम व्यावसायिक विश्वनाथ पनवेलकर यांच्या घरावर अज्ञात हल्लेखोरांनी भरदिवसा गोळीबार केला. ही घटना हुतात्मा चौक परिसरातील ‘सीताई सदन’…

    “पत्नीला मूल होत नाही म्हणून तहसीलदाराची राक्षसी वागणूक – धक्कादायक गुन्ह्याचा उलगडा”

    नांदेड –प्रशासनातील वरिष्ठ पदांवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून समाज अपेक्षा करतो की, त्यांनी कायद्याचा आदर राखावा, सामाजिक भान ठेवावं आणि वर्तनात सभ्यतेचा आदर्श प्रस्तुत करावा. मात्र नांदेडमध्ये समोर आलेली एक घटना…

    Leave a Reply

    You Missed

    CSMT स्थानकात मोठा अपघात टळला: क्लिनिंग मशीन रुळावर कोसळली, मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला

    CSMT स्थानकात मोठा अपघात टळला: क्लिनिंग मशीन रुळावर कोसळली, मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला

    मॉन्सूनने अंदमानात दिली हजेरी, महाराष्ट्रात 6 जूनला आगमनाची शक्यता – हवामान विभागाचा अंदाज

    भारत-पाकिस्तान युद्धबंदीवर सहमती; ट्रम्प यांचा मोठा दावा, भारत-पाकिस्तानकडून अधिकृत प्रतिक्रिया

    भारत-पाकिस्तान युद्धबंदीवर सहमती; ट्रम्प यांचा मोठा दावा, भारत-पाकिस्तानकडून अधिकृत प्रतिक्रिया

    भारत-पाकिस्तान संघर्षात नवे वळण: पाकिस्तानचा रात्रीच्या सत्रात हवाई हल्ला, भारताचे चोख प्रत्युत्तर

    भारत-पाकिस्तान संघर्षात नवे वळण: पाकिस्तानचा रात्रीच्या सत्रात हवाई हल्ला, भारताचे चोख प्रत्युत्तर

    भारत-पाकिस्तान संघर्ष: गेल्या १२ तासांमध्ये काय घडले ? 

    भारत-पाकिस्तान संघर्ष: गेल्या १२ तासांमध्ये काय घडले ? 

    MH/BASSEIN आणि NEELAM क्षेत्र “नो फिशिंग झोन” – भारतीय नौसेनेकडून आदेश, मत्स्यव्यवसाय विभागाचा शासन निर्णय जाहीर

    MH/BASSEIN आणि NEELAM क्षेत्र “नो फिशिंग झोन” – भारतीय नौसेनेकडून आदेश, मत्स्यव्यवसाय विभागाचा शासन निर्णय जाहीर

    भारत-पाकिस्तान संघर्ष: 9 मे 2025 च्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे

    भारत-पाकिस्तान संघर्ष: 9 मे 2025 च्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे