म्यानमार आणि थायलंडमध्ये झालेल्या जबरदस्त भूकंपामध्ये ७०० हून अधिक जणांचा मृत्यू तर हजारो जखमी !

नेपीडॉ / बँकॉक : एकीकडे गृहयुद्ध, दुसरीकडे आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या म्यानमारवर आता भूकंपाचं भीषण संकट कोसळलं आहे. म्यानमार आणि थायलंडमध्ये शुक्रवारी झालेल्या विनाशकारी भूकंपात ७०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून, १६७० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, तब्बल ३० लाख नागरिकांना आपली घरं सोडावी लागली आहेत.

भूकंपाचा केंद्रबिंदू म्यानमारमधील दुसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या शहराजवळ, मंडालेपासून सुमारे १७ किलोमीटर अंतरावर होता. रिष्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ७.७ इतकी नोंदवण्यात आली. भूकंपानंतर लागोपाठ सात धक्के बसले असून, त्यात अनेक इमारती, घरे जमीनदोस्त झाली आहेत. शेकडो नागरिक ढिगाऱ्याखाली अडकले असून, बचाव व मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. रस्ते, महामार्ग, पूल यांना मोठ्या प्रमाणावर तडे गेले असून, अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे.

यूएस जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) च्या माहितीनुसार, हा भूकंप १० किलोमीटर खोल भूभागात झाला होता. यानंतर आणखी ६.४ तीव्रतेचा धक्का बसला. या पार्श्वभूमीवर म्यानमार आणि थायलंड सरकारने देशात आणीबाणी जाहीर केली असून, म्यानमारच्या लष्करशाहीने सहा प्रांतांत विशेष आपत्कालीन स्थिती लागू केली आहे.

भूकंपाचे धक्के पाच देशांना जाणवले

या शक्तिशाली भूकंपाचे परिणाम केवळ म्यानमार आणि थायलंडपुरते मर्यादित राहिले नाहीत. बांगलादेश, लाओस, चीन व भारताच्या सीमावर्ती भागांतही भूकंपाचे धक्के जाणवले. भारतात मणिपूर आणि पश्चिम बंगालमध्ये धक्के जाणवले, मात्र कोणतीही जीवितहानी झाल्याची नोंद नाही.

भारत म्यानमार व थायलंडच्या पाठीशी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भूकंपामुळे झालेल्या नुकसानीबद्दल दु:ख व्यक्त करताना सांगितले की, “अडचणीच्या प्रसंगी भारत म्यानमार आणि थायलंडच्या सोबत उभा आहे. या दोन्ही देशांना आवश्यक ती सर्व मदत करण्यास भारत तयार आहे.” त्यानुसार भारताने तत्काळ मदतकार्यासाठी मदतीचा हात पुढे करत आवश्यक साहित्य आणि आपत्कालीन पथके पाठवली आहेत.

  • Related Posts

    पहलगाम संदर्भात मोठा खुलासा

    22 एप्रिल 2025 रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील बायसरण व्हॅलीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आणि 20 हून अधिक जण जखमी झाले. या हल्ल्याच्या वेळी, एक वरिष्ठ…

    Pahalgam Terror Attack :”किमान शत्रूकडून शिका!”; माजी पाकिस्तानी राजदूत अब्दुल बासित यांचा मंत्र्यांना खरमरीत सल्ला !

    जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानसोबतचा ऐतिहासिक सिंधू जल करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या या निर्णायक पावलामुळे पाकिस्तानमध्ये मोठी खळबळ माजली आहे. त्यांच्या नेत्यांकडून…

    Leave a Reply

    You Missed

    पहलगाम संदर्भात मोठा खुलासा

    पहलगाम संदर्भात मोठा खुलासा

    काश्मीरमध्ये पहलगाम हल्ल्यानंतर संतापाची लाट..

    काश्मीरमध्ये पहलगाम हल्ल्यानंतर संतापाची लाट..

    Pahalgam Terror Attack :”किमान शत्रूकडून शिका!”; माजी पाकिस्तानी राजदूत अब्दुल बासित यांचा मंत्र्यांना खरमरीत सल्ला !

    Pahalgam Terror Attack :”किमान शत्रूकडून शिका!”; माजी पाकिस्तानी राजदूत अब्दुल बासित यांचा मंत्र्यांना खरमरीत सल्ला !

    पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात हाय अलर्टचा इशारा ; रेल्वे स्थानकांवर १० हजार कॅमेऱ्यांची देखरेख !

    पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात हाय अलर्टचा इशारा ; रेल्वे स्थानकांवर १० हजार कॅमेऱ्यांची देखरेख !

    पाकिस्तानच्या लाहोर विमानतळावर आगीचा कहर; अनेक विमानांची उड्डाणे ठप्प !

    पाकिस्तानच्या लाहोर विमानतळावर आगीचा कहर; अनेक विमानांची उड्डाणे ठप्प  !

    पहलगाम हल्ल्यानंतर एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय; वीरगती प्राप्त आदिल हुसेनच्या कुटुंबाला सरकारकडून नवे घर !

    पहलगाम हल्ल्यानंतर एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय; वीरगती प्राप्त आदिल हुसेनच्या कुटुंबाला सरकारकडून नवे घर !

    POK मध्ये रचला पहलगाम हल्ल्याचा कट; हमास, हाफिज आणि मसूद या तीन दहशतवाद्यांची एकजूट..!

    POK मध्ये रचला पहलगाम हल्ल्याचा कट; हमास, हाफिज आणि मसूद या तीन दहशतवाद्यांची एकजूट..!

    पहेलगाम हल्ल्याचा धडका : अटारी बॉर्डर बंद, भारत-पाक व्यापार ठप्प – शेजाऱ्याला आर्थिक धक्का !

    पहेलगाम हल्ल्याचा धडका : अटारी बॉर्डर बंद, भारत-पाक व्यापार ठप्प – शेजाऱ्याला आर्थिक धक्का !

    पहलगाममध्ये भीषण हल्ला: महाराष्ट्राचे सहा बळी, अनेकांचे प्राण थोडक्यात वाचले..!

    पहलगाममध्ये भीषण हल्ला: महाराष्ट्राचे सहा बळी, अनेकांचे प्राण थोडक्यात वाचले..!