“कलम ३७०नंतर पुढचं पाऊल; पाकव्याप्त काश्मीर भारतात परतणार..”–जयशंकर यांचं मोठं विधान

भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी लंडनमध्ये एका महत्त्वाच्या मुलाखतीत काश्मीर प्रश्नावर मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, “पाकव्याप्त काश्मीर (PoK) हा भारताचाच भाग असून तो परत मिळण्याची आम्ही प्रतीक्षा करत आहोत. हा भाग भारतात परत आल्यास जम्मू-काश्मीरमध्ये कायमस्वरूपी शांतता निर्माण होईल.”

लंडनमधील थिंक टँक ‘चॅथम हाऊस’ येथे ‘भारताचा उदय व जागतिक भूमिका’ या विषयावर बोलताना त्यांनी काश्मीर प्रश्नावर भारताची स्पष्ट भूमिका मांडली. काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत कोणती रणनीती अवलंबत आहे, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी सांगितले की, शांतता प्रस्थापनेसाठी भारत तीन टप्प्यांमध्ये काम करत आहे.

तीन टप्प्यांची प्रक्रिया

जयशंकर यांनी सांगितले की, “शांतता निर्माण करण्यासाठी पहिला टप्पा होता कलम ३७० हटवणे. हा टप्पा आम्ही पूर्ण केला आहे. दुसऱ्या टप्प्यात काश्मीरच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जात आहे – आर्थिक सुधारणा, रोजगार निर्मिती आणि सामाजिक न्यायाची अंमलबजावणी सुरू आहे. तिसऱ्या टप्प्यात काश्मीरमध्ये लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदानाचे प्रमाण वाढवण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. नुकत्याच झालेल्या निवडणुकांमुळे हा टप्पाही पार पडत आहे.”

“आता पाकव्याप्त काश्मीरची वेळ”

जयशंकर पुढे म्हणाले, “आम्ही कलम ३७० हटवलं, निवडणुका घेतल्या आणि आता पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा सोडवायची वेळ आली आहे. पाकिस्तानकडून बळकावण्यात आलेला हा भाग परत मिळवणं हेच काश्मीरच्या दिर्घकालीन स्थैर्यासाठी आवश्यक आहे. तो भाग भारतात परत आल्यानंतर सर्व समस्या सुटतील.”

अमेरिकेच्या धोरणांचा भारताला लाभ?

अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांबाबत विचारले असता जयशंकर म्हणाले, “अमेरिका बहुध्रुवीयतेच्या दिशेने वाटचाल करत असून हे धोरण भारताच्या हिताचं आहे. दोन्ही देश द्विपक्षीय व्यापार कराराच्या आवश्यकतेवर सहमत आहेत आणि यामुळे भारत-अमेरिका संबंध आणखी बळकट होतील.”

जयशंकर यांच्या या वक्तव्यामुळे भारताच्या परराष्ट्र धोरणात मोठे संकेत मिळाले असून, पाकव्याप्त काश्मीरबाबत भारताची भूमिका अधिक ठाम होत असल्याचं स्पष्ट होत आहे.

  • Related Posts

    सुनीता विल्यम्स पृथ्वीच्या दिशेने; अखेर नऊ महिन्यानंतर परतीचा प्रवास सुरू…!

    नऊ महिन्यांच्या दीर्घ मुक्कामानंतर नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांनी अखेर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) सोडले असून, त्यांचा पृथ्वीवर परतीचा प्रवास सुरू झाला आहे. सुरुवातीला हा प्रवास केवळ…

    युक्रेनचा रशियावर मोठा हल्ला – शांतता चर्चेच्या आधीच जेलेंस्कींकडून दगा?

    रशिया आणि युक्रेनमध्ये तीन वर्षांपासून सुरू असलेलं युद्ध थांबवण्यासाठी शांतता चर्चेची तयारी सुरू आहे. यासाठी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर जेलेंस्की, अमेरिकेचे मंत्री मार्को रुबियो आणि रशियाचे प्रतिनिधी सौदी अरेबियात पोहोचले आहेत.…

    Leave a Reply

    You Missed

    नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुनर्जन्म? भाजपा खासदाराच्या विधानावर वादंग..!

    नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुनर्जन्म? भाजपा खासदाराच्या विधानावर वादंग..!

    सुनीता विल्यम्स पृथ्वीच्या दिशेने; अखेर नऊ महिन्यानंतर परतीचा प्रवास सुरू…!

    सुनीता विल्यम्स पृथ्वीच्या दिशेने; अखेर नऊ महिन्यानंतर परतीचा प्रवास सुरू…!

    नागपुरमध्ये दगडफेक, जाळपोळ आणि अफवा ; नितीन गडकरींचे नागरिकांना शांततेचे आवाहन !

    नागपुरमध्ये दगडफेक, जाळपोळ आणि अफवा ; नितीन गडकरींचे नागरिकांना शांततेचे आवाहन !

    दंगलीचे सावट! महालमधील हिंसाचाराने नागपूर सतर्क…

    दंगलीचे सावट! महालमधील हिंसाचाराने नागपूर सतर्क…

    नागपूर महालमध्ये दोन गटांमध्ये तणाव; दगडफेक, वाहनांची तोडफोड

    नागपूर महालमध्ये दोन गटांमध्ये तणाव; दगडफेक, वाहनांची तोडफोड

    इतिहास जिवंत करणारे भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन..!

    इतिहास जिवंत करणारे भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन..!

    “मी मराठी – अभिमान महाराष्ट्राचा”-आंबोली येथे आयोजित भव्य दिव्य शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न..!

    “मी मराठी – अभिमान महाराष्ट्राचा”-आंबोली येथे आयोजित भव्य दिव्य शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न..!

    राज ठाकरेंच्या शिवजयंतीनिमित्त संदेशात प्रेरणादायी विचार…!

    राज ठाकरेंच्या शिवजयंतीनिमित्त संदेशात प्रेरणादायी विचार…!

    फरहान आझमी यांची काँग्रेसच्या शिस्तभंग समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

    फरहान आझमी यांची काँग्रेसच्या शिस्तभंग समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती