आमदारांच्या रोषामुळे अबू आझमींची माघार, औरंगजेबाबतचं वक्तव्य घेतलं मागे !

मुंबई: समाजवादी पक्षाचे नेते आणि मानखुर्द-शिवाजीनगरचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाबद्दल केलेल्या विधानामुळे राज्याच्या राजकारणात मोठा वाद उफाळला. त्यांच्या वक्तव्यावर विधानसभेत प्रखर विरोध होताच, अखेर आझमी नरमले आणि त्यांनी आपले वक्तव्य मागे घेतले.

  • विधानसभेत प्रचंड गदारोळ
    आज (४ मार्च) विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी भाजपा व शिवसेना (शिंदे गट) आमदारांनी सभागृहात आझमी यांच्या वक्तव्यावरून जोरदार गोंधळ घातला. “आझमी यांनी माफी मागावी,” अशी मागणी करण्यात आली. या गोंधळामुळे अखेर विधानसभेचे कामकाज तहकूब करावे लागले.
  • नेमकं काय म्हणाले होते अबू आझमी?
    काल विधिमंडळाच्या बाहेर माध्यमांशी बोलताना अबू आझमी यांनी “औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता” असे विधान केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर जोरदार टीका झाली.
  • वक्तव्य मागे घेताना आझमी म्हणाले…
    गोंधळानंतर अबू आझमी यांनी स्पष्टीकरण देत वक्तव्य मागे घेतले. ते म्हणाले, “माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. मी कोणाचाही अपमान केलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज यांचा मी आदर करतो. विधानसभेचे कामकाज तहकूब होऊ नये म्हणून मी वक्तव्य मागे घेतो.”
  • सत्ताधाऱ्यांचा आक्रमक पवित्रा कायम
    या मुद्द्यावरून भाजप व शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतली असून, आझमी यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे.

Related Posts

नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुनर्जन्म? भाजपा खासदाराच्या विधानावर वादंग..!

लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण ईश्वरीय आदेशाने आलो असल्याचं विधान केलं होतं. त्यावर मोठी चर्चा आणि विरोधकांकडून टीका झाली होती. त्याच पार्श्वभूमीवर आता भाजपाचे ओडिशातील खासदार प्रदीप पुरोहित…

फरहान आझमी यांची काँग्रेसच्या शिस्तभंग समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

नवी दिल्ली – ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने महत्त्वाचा निर्णय घेत डिसिप्लिनरी ऍक्शन कमिटीच्या (शिस्तभंग समिती) अध्यक्षपदी फरहान आझमी यांची नियुक्ती जाहीर केली आहे. पक्ष संघटनेत शिस्त व नियोजनबद्धता राखण्यासाठी ही…

Leave a Reply

You Missed

नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुनर्जन्म? भाजपा खासदाराच्या विधानावर वादंग..!

नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुनर्जन्म? भाजपा खासदाराच्या विधानावर वादंग..!

सुनीता विल्यम्स पृथ्वीच्या दिशेने; अखेर नऊ महिन्यानंतर परतीचा प्रवास सुरू…!

सुनीता विल्यम्स पृथ्वीच्या दिशेने; अखेर नऊ महिन्यानंतर परतीचा प्रवास सुरू…!

नागपुरमध्ये दगडफेक, जाळपोळ आणि अफवा ; नितीन गडकरींचे नागरिकांना शांततेचे आवाहन !

नागपुरमध्ये दगडफेक, जाळपोळ आणि अफवा ; नितीन गडकरींचे नागरिकांना शांततेचे आवाहन !

दंगलीचे सावट! महालमधील हिंसाचाराने नागपूर सतर्क…

दंगलीचे सावट! महालमधील हिंसाचाराने नागपूर सतर्क…

नागपूर महालमध्ये दोन गटांमध्ये तणाव; दगडफेक, वाहनांची तोडफोड

नागपूर महालमध्ये दोन गटांमध्ये तणाव; दगडफेक, वाहनांची तोडफोड

इतिहास जिवंत करणारे भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन..!

इतिहास जिवंत करणारे भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन..!

“मी मराठी – अभिमान महाराष्ट्राचा”-आंबोली येथे आयोजित भव्य दिव्य शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न..!

“मी मराठी – अभिमान महाराष्ट्राचा”-आंबोली येथे आयोजित भव्य दिव्य शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न..!

राज ठाकरेंच्या शिवजयंतीनिमित्त संदेशात प्रेरणादायी विचार…!

राज ठाकरेंच्या शिवजयंतीनिमित्त संदेशात प्रेरणादायी विचार…!

फरहान आझमी यांची काँग्रेसच्या शिस्तभंग समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

फरहान आझमी यांची काँग्रेसच्या शिस्तभंग समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती