ऑनलाइन ओळख, ऑफलाइन लूट – पर्वतीत तरुणाला २५ हजारांचा फटका !

सोशल मीडियावर एका मैत्रीविषयक ॲपवर झालेली ओळख मसाज थेरपिस्टला महागात पडली आहे. पोलीस असल्याची बतावणी करुन चोरट्याने त्याच्याकडील २५ हजारांची रोकड लुटून नेल्याची घटना पर्वती पायथा परिसरात घडली आहे.

या संदर्भात एका तरुणाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, समीर बेगमपुर असे नाव सांगणाऱ्या चोरट्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण मसाज थेरपिस्ट आहे. ते ग्राहकांच्या घरी जाऊन मसाज करतात. ग्राहक सेवा देण्यासाठी ते एका ॲपचा वापर करतात. २५ फेब्रुवारी रोजी तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर समीर बेगमपूर असे नाव सांगणाऱ्या चोरट्याने संदेश पाठविला. त्याने मसाज करायचा असल्याची बतावणी केली. त्यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास भेटायचे ठरले.

पर्वती पायथा परिसरात आरोपी बेगमपुरेने तरुणाची भेट घेतली. त्याने पोलीस असल्याची बतावणी करुन तरुणाला मारहाण केली. याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची धमकी देऊन तरुणाकडून २५ हजार रुपयांची मागणी केली. तरुणाला दुचाकीवर घेऊन आरोपी बेगमपुरे लक्ष्मीनारायण चित्रपटगृह परिसरात गेला. तरुणाला एका बँकेच्या एटीएममध्ये नेले. तरुणाला धमकावून त्याच्याकडून २५ हजार रुपये घेऊन आरोपी दुचाकीवरुन पसार झाला.

Related Posts

ठाण्यात तलवारी-कोयत्यांसह दहशत माजवणारे अखेर गजाआड !

शहरात तलवारी आणि कोयते घेऊन दहशत माजवणाऱ्या तिघांना गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल…

‘कृपया पुरुषांबद्दल विचार करा’; आग्रा येथे टीसीएस मॅनेजरची आत्महत्या, मृत्यूपूर्वी शूट केला भावनिक व्हिडिओ

उत्तर प्रदेशातील आग्रा येथे एका नामांकित आयटी कंपनीतील मॅनेजर मानव शर्मा याने गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी, मानवने एक भावनिक व्हिडिओ रेकॉर्ड केला असून, त्यामध्ये…

Leave a Reply

You Missed

नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुनर्जन्म? भाजपा खासदाराच्या विधानावर वादंग..!

नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुनर्जन्म? भाजपा खासदाराच्या विधानावर वादंग..!

सुनीता विल्यम्स पृथ्वीच्या दिशेने; अखेर नऊ महिन्यानंतर परतीचा प्रवास सुरू…!

सुनीता विल्यम्स पृथ्वीच्या दिशेने; अखेर नऊ महिन्यानंतर परतीचा प्रवास सुरू…!

नागपुरमध्ये दगडफेक, जाळपोळ आणि अफवा ; नितीन गडकरींचे नागरिकांना शांततेचे आवाहन !

नागपुरमध्ये दगडफेक, जाळपोळ आणि अफवा ; नितीन गडकरींचे नागरिकांना शांततेचे आवाहन !

दंगलीचे सावट! महालमधील हिंसाचाराने नागपूर सतर्क…

दंगलीचे सावट! महालमधील हिंसाचाराने नागपूर सतर्क…

नागपूर महालमध्ये दोन गटांमध्ये तणाव; दगडफेक, वाहनांची तोडफोड

नागपूर महालमध्ये दोन गटांमध्ये तणाव; दगडफेक, वाहनांची तोडफोड

इतिहास जिवंत करणारे भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन..!

इतिहास जिवंत करणारे भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन..!

“मी मराठी – अभिमान महाराष्ट्राचा”-आंबोली येथे आयोजित भव्य दिव्य शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न..!

“मी मराठी – अभिमान महाराष्ट्राचा”-आंबोली येथे आयोजित भव्य दिव्य शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न..!

राज ठाकरेंच्या शिवजयंतीनिमित्त संदेशात प्रेरणादायी विचार…!

राज ठाकरेंच्या शिवजयंतीनिमित्त संदेशात प्रेरणादायी विचार…!

फरहान आझमी यांची काँग्रेसच्या शिस्तभंग समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

फरहान आझमी यांची काँग्रेसच्या शिस्तभंग समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती